महर्षींच्या आज्ञेनुसार नवरात्रोत्सवात करण्यात आले देवींच्या कृपेसाठी होम !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे अन् सर्वत्रच्या साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, यासाठी महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात नवरात्रोत्सवाच्या काळात (२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२) देवींच्या कृपेसाठी होम करण्यात आले.