भावी महाभीषण आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे, तसेच योगासने आणि प्राणायाम यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे.

आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या संतोष गरुड यांना आलेले अनुभव आणि साधनेची झालेली जाणीव

६.५.२०१७ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमात सेवेच्या निमित्ताने दुचाकीने निघालो होतो. पर्वरी (गोवा) येथून पानवळ हे गाव ३८ कि.मी अंतरावर आहे. साधारण ३० कि.मी. अंतर पार केल्यानंतर पत्नी सौ. समृद्धी हिचा आश्रमातून भ्रमणभाष आला.

नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाल्याने तेथील जनतेने अनुभवलेली भयावह आपत्कालीन स्थिती !

२०.९.२०१५ या दिवशी नवीन राज्यघटनेनुसार नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर राजकीय स्तरावर पुष्कळ चढउतार झाले आणि अजूनही होत आहेत. अन्नधान्य आणि औषधे यांपासून औद्योगिक साहित्यापर्यंत नेपाळ भारतावरच अवलंबून आहे.