सूक्ष्म-चित्रकलेच्या माध्यमातून अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि चित्रकलारूपी तेजाकडून ज्ञानरूपी आकाशाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

जगामध्ये अनेक कला महाविद्यालये आहेत; परंतु कोणत्याही कला महाविद्यालयामध्ये अध्यात्माच्या संदर्भातील शिक्षण दिले जात नाही. ‘कला म्हणजे नेमके काय ?’ ‘त्यांचे किती प्रकार असतात आणि आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व काय ?’, याचे शिक्षण कोणत्याही कला महाविद्यालयांमध्ये दिले जात नाही.

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र आणि त्यांची वैशिष्ट्ये

स्थूल पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.