विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप – ५

Article also available in :

अनुक्रमणिका

शब्दातीत कृतज्ञता जागृत होणे

‘विकारांवर नामजपाचे उपाय’ यावर संशोधन करावे’, असा विचार मनात आल्यानंतर दोन दिवसांनी सद्गुरु डॉ. गाडगीळ यांचा त्याच विषयावरील लेख वाचून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याबद्दल शब्दातीत कृतज्ञता जागृत झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’ हा लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्यावर मला आठवण झाली की, त्या पूर्वी २ दिवस माझ्या मनात विचार आला होता, ‘अशा प्रकारचे संशोधन आपण करावे; म्हणजे बर्‍याच जणांना त्याचा लाभ होईल, विशेषतः तिसर्‍या महायुद्धाच्या काळात जेव्हा औषधे नसतील, तेव्हा सर्वांना अलभ्य लाभ होईल.’ माझ्या मनातील विचार आधीच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या मनात देवाने आणला आणि आवश्यक ते लिखाण पूर्ण करून घेतले; म्हणून माझ्या मनात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याबद्दल शब्दातीत कृतज्ञता जागृत झाली आणि त्यांना तो विचार दिल्याबद्दल देवतांविषयी भाव जागृत झाला.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘पुढे येणार्‍या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि त्यांची औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा ‘कोणत्या आजारासाठी कोणता उपाय करायचा’, हे कळणे कठीण जाईल. तेव्हा हे कळावे; म्हणून साधकांनी हा लेख संग्रही ठेवावा आणि त्यात दिल्याप्रमाणे नामजप करावा. त्यामुळे आजार अल्प होण्यास लाभ होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.६.२०२२)

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत. मी शोधलेले हे जप साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले. दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) काही विकार, त्यांवरील जप आणि साधकांनी तो जप केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापल्या होत्या. आज आणखी काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे नामजप गेल्या ३ मासांत काही साधकांना दिले आहेत. त्या साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती लवकरात लवकर ग्रंथासाठी लिहून या लेखात खाली दिलेल्या ई-मेल किंवा टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात.

विकारांवर ध्यानातून नामजप शोधतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

 

१. वरील विकारांपैकी काही विकारांच्या संदर्भात
सांगितलेल्या जपांविषयी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१ अ. लघवीमधून प्रथिने (प्रोटीन) जाणे (नेफ्रॉटिक सिंड्रोम)

हा मूत्रपिंडाचा (‘किडनी’चा) विकार आहे. यामध्ये लघवीमधून पुष्कळ प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) जातात. एका साधिकेच्या ९ वर्षे वयाच्या मुलाला वर्ष २०१५ पासून हा विकार झाला होता. हा विकार त्याला प्रत्येक ३ – ४ मासांनी (महिन्यांनी) व्हायचा. तेव्हा त्याला ‘स्टिरॉइड’ द्यावे लागायचे. ‘स्टिरॉइड’मुळे त्या मुलाच्या सर्वांगाला पुष्कळ सूज यायची. त्याच्या या विकारावर मी २१ डिसेंबर २०२१ या दिवशी नामजप दिला. तो नामजप साधिकेने मुलासाठी प्रतिदिन १ घंटा केला. जपाला आरंभ केल्यावर ७ दिवसांत मुलाच्या लघवीतून प्रथिने जाणे बंद झाले. साधिकेला ‘मुलाच्या लघवीतून प्रथिने जात आहेत का ?’, हे घरीच सोप्या पद्धतीने पडताळता यायचे. मुलाला प्रत्येक ३ – ४ मासांनी होत असलेला हा विकार नामजपामुळे पूर्णपणे थांबला, तरीही मुलाच्या आईने अजूनही मुलासाठी नामजप करणे चालू ठेवले आहे. या विकारावर मुलाच्या आईने नंतर होमिओपथीचे औषध चालू केले; कारण त्या डॉक्टरांना ‘त्या मुलाचा हा विकार कसल्यातरी भीतीने उद्भवत आहे’, असे लक्षात आले. त्यांच्या औषधाने हे मूळ कारण ते दूर करत आहेत.

१ आ. समलैंगिक आकर्षण वाटणे

एका जिज्ञासूला समलैंगिक आकर्षण वाटण्याचा त्रास होत होता. त्याने मोकळेपणाने ही समस्या मांडल्यावर त्याला हा विकार जाण्यासाठी मी नामजप सांगितला. तो हा नामजप प्रतिदिन १ घंटा करू लागल्यावर त्याचा तो त्रास २० दिवसांत पुष्कळ न्यून झाला.

१ इ. युवावस्थेत लैंगिक विचार अधिक प्रमाणात येणे

एका तरुण जिज्ञासूला स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण पुष्कळ प्रमाणात वाटायचे आणि त्यांच्याबद्दल सतत मनात विचार यायचे. त्यामुळे त्याला साधना करण्यात अडथळा येत होता. त्याने याबद्दल नामजप विचारल्यावर त्याला तो देण्यात आला. त्याने तो नामजप नियमितपणे १५ दिवस केल्यावर त्याचा तो त्रास पुष्कळ प्रमाणात दूर झाला.

१ ई. शरिरात ‘इन्शुलिन’ सिद्ध न होणे (डायबिटीज)

एका डॉक्टर असलेल्या साधकाच्या १६ वर्षे वयाच्या मुलाच्या शरिरात ‘इन्शुलिन’ सिद्धच होत नाही. असे लाखात एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात घडते. त्यामुळे अशा व्यक्तीला प्रत्येक ३ मासांनी (महिन्यांनी) ‘रक्तातील ‘इन्शुलिन’चे प्रमाण किती आहे ?’, हे पडताळून त्याप्रमाणे उपचार घ्यावे लागतात. या साधकाच्या मुलाला मी या विकारावर जानेवारी २०२२ मध्ये नामजप दिला. त्याने गेले ४ मास प्रतिदिन १ घंटा तो नामजप केल्याने त्याच्या रक्तातील ‘इन्शुलिन’चे प्रमाण न घटता ते १ नॅनोग्रॅम/१ मिलीलिटर एवढे टिकून राहिले. रक्तातील ‘इन्शुलिन’चे सर्वसामान्य प्रमाण २ नॅनोग्रॅम/१ मिलीलिटर असते. त्यामुळे आता त्याला नामजप प्रतिदिन २ घंटे करण्यास सांगितले आहे.

१ उ. झोपेत बडबडणे, ओरडणे आणि शेजारच्या व्यक्तीच्या अंगावर धावून जाणे

दोन साधकांना हा त्रास होत होता. या दोन्ही साधकांना या विकारावर शोधलेला नामजप दिल्यावर दोघांचाही हा त्रास २ आठवड्यांत बरा झाला.

१ ऊ. शरिरात स्नायूची गाठ होणे

मार्च २०२२ मध्ये एका साधिकेच्या वहिनीच्या पोटात स्नायूची गाठ निर्माण झाली होती. तिला मी या विकारावरील नामजप दिला. तिने तो १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा केला. त्यानंतर तिला ‘ती गाठ दबली गेली आहे’, असे जाणवले. ती डॉक्टरांकडे तपासणी करायला गेली. डॉक्टरांनी ‘स्कॅनिंग’ केल्यावर त्यांना आढळले, ‘त्या गाठीचे विघटन झाले आहे.’ डॉक्टर त्या साधिकेला म्हणाले, ‘‘स्नायूच्या गाठीचे असे विघटन झालेले मी प्रथमच पहात आहे. असे कधी शक्य नसते. गाठ नाहीशी होण्याच्या प्रक्रियेमधील हे चांगले लक्षण आहे.’’ हा परिणाम नामजपाचा होता, हे लक्षात येते.

१ ए. ‘मायस्थेनिया ग्रॅव्हिस’ (मेंदूकडून विशिष्ट स्नायूशी निगडित
चेतातंतूपर्यंत (नर्व्हपर्यंत) आलेली संवेदना त्या स्नायूमध्ये
जाण्यापासून प्रतिबंधित झाल्याने त्या स्नायूने कार्य न करणे)

हा एक गंभीर स्वरूपाचा विकार असून तो चेतातंतू (नर्व्ह्ज) आणि स्नायू यांच्या संधिस्थानाशी (न्यूरोमस्क्यूलर जंक्शनशी) संबंधित आहे. हा विकार ‘ऑटोइम्यून डिसॉॅर्डर’ (स्वतःतील प्रतिकारसंस्थेने स्वतःच्याच शरिरावर अथवा शरिराच्या घटकावर आक्रमण करणे) या प्रकारच्या विकारांच्या वर्गात मोडतो. ‘मायस्थेनिया ग्रॅव्हिस’मध्ये अस्थींना जोडलेले स्नायू विकारग्रस्त होतात. त्यामुळे अवयवांची हालचाल करण्यासाठी आणि श्वसनक्रियेशी संबंधित जे स्नायू असतात, ते या विकारात कमकुवत होतात. एका साधिकेला हा विकार झाला होता. त्यामुळे तिला कोणतीही कृती करणे, उदा. बोटांनी साधा पेन उचलता येणेही अशक्य झाले होते. ती दमून जायची. त्यामुळे तिला झोपून रहावे लागे. यावर औषधस्वरूपात ‘स्टिरॉइड’ घेणे, हा उपचार आहे; पण त्यामुळेही सूज येण्यासारखा दुष्परिणाम होतो.

मी तिला या विकारावर फेब्रुवारी २०२२ मध्ये नामजप शोधून दिला. ती हा नामजप प्रतिदिन २ घंटे करू लागली. या नामजपाचा तिला एका मासातच (महिन्यातच) चांगला लाभ दिसून आला. ती दैनंदिन कृती करू लागली. डॉक्टरांनीही ‘हा चांगला पालट आहे आणि आता विकार आटोक्यात आला आहे’, असे सांगून तिच्या ‘स्टिरॉइड’ औषधांचे प्रमाणही न्यून केले. तसेच डॉक्टर म्हणाले, ‘‘या विकाराचा श्वसनक्रियेवर परिणाम झाला नाही, हे महत्त्वाचे आहे, नाहीतर गंभीर स्थिती निर्माण झाली असती.’’

१ ऐ. ‘ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्माेन’चे प्रमाण वाढणे

फेब्रुवारी २०२२ मध्ये एका साधिकेच्या शरिरातील ‘ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्माेन’ या ‘हार्माेन’चे (संप्रेरकाचे) प्रमाण वाढले असल्याचे निदान झाले. तिचा रक्तदाब नेहमी न्यून असायचा. (रक्तातील ‘कॉर्टिसॉल’ या हार्माेनचे प्रमाण अल्प झाल्यास ‘ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्माेन’चे प्रमाण वाढते. रक्तदाब न्यून होण्याचे कारण ‘कॉर्टिसॉल’ या हार्माेनचे प्रमाण अल्प होणे’, हे आहे.) तिला थकवा असायचा, तसेच तिच्या चयापचय (मेटॅबोलिझम) क्रियेवरही परिणाम झाला होता. या सर्वांमुळे तिच्या शरिराची प्रतिकारक्षमताही न्यून झाली होती. तिच्या या विकारावर मी तिला मार्च २०२२ मध्ये नामजप दिला आणि तो प्रतिदिन १ घंटा करण्यास सांगितला. तिने तो ३ मास केला. तिने या विकारावर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे १ मास (महिना) ‘स्टिरॉईड’ घेतले. जून २०२२ मध्ये तिची शारीरिक स्थिती थोडी सुधारली. तिचे थकव्याचे प्रमाण न्यून झाले, आधी न्यून असलेला रक्तदाब वाढला, तसेच तिला अन्न पचू लागले. तिच्यातील ‘ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्माेन’चे प्रमाण पूर्वी जे ७२.६ पिकोग्रॅम/१ मिलीलिटर होते, ते आता ६४.१ पिकोग्रॅम/१ मिलीलिटर झाले. (‘ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्माेन’चे सर्वसाधारण प्रमाण ४६ पिकोग्रॅम/१ मिलीलिटरच्या खाली हवे.)

 

२. जपांचे महत्त्व

आपत्काळात औषधे, डॉक्टर यांची टंचाई भासेल, तेव्हा या जपांचा चांगला उपयोग होईल.

 

३. कृतज्ञता

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी हे जप शोधू शकलो आणि त्या जपांची चांगली परिणामकारकताही लक्षात आली. यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पी.एच् डी.,  गोवा (३.७.२०२२)

यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणार्‍या अनुभूती [email protected] या ई-मेलवर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता सिद्ध होण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतील.

टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१.

Leave a Comment