
‘जीवनाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करणारे महर्षि, तसेच द्रष्टे संत यांनी भविष्यात वर्तवल्याप्रमाणे लवकरच भीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. तेव्हा नेत्रतपासणी करणे, डोळ्यांचे शस्त्रकर्म करून घेणे, तसेच ‘उपनेत्र हरवणे, त्याची काच फुटणे’ अशा समस्या उद्भवल्यास उपनेत्र बनवून घेणे कठीण होईल. त्यामुळे पूर्वीपासून उपनेत्र वापरत असलेल्या व्यक्तींनी न्यूनतम ६ मासांपूर्वी नेत्रतपासणी केली नसेल, तर तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे ज्यांना डोळ्यांविषयी थोडासा जरी त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी. मोतीबिंदू, काचबिंदू इत्यादींची शक्यता वाटत असल्यास शस्त्रकर्माच्या दृष्टीने तपासणी करून घ्यावी. केवळ एक उपनेत्र असणार्या व्यक्तींनी त्याच ‘नंबर’चे एक अतिरिक्त उपनेत्रही बनवून घ्यावे. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले
(‘पुढे भीषण आपत्काळात अन्नधान्य, पाणी, वीज अशा अनेक गोष्टींची उणीव भासू नये, यासाठी आताच पूर्वसिद्धता कशी करावी’, हे जाणून घेण्यासाठी सनातनच्या ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ या ग्रंथाचा लाभ घ्या ! )’

श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !