‘सनातन-निर्मित संतांची छायाचित्रे आणि देवतेचे चित्र यांचा आपल्या संकेतस्थळावर वापर करून अर्पणदात्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे आवाहन करणार्‍या आध्यात्मिक संस्थेचा सनातनशी काही संबंध नाही’, हे लक्षात घ्या !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक, जिज्ञासू अन् अर्पणदाते यांना नम्र विनंती !


‘एका आध्यात्मिक संस्थेने गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करण्याचे आवाहन करणारा ‘व्हॉट्सॲप’ संदेश सर्वत्र प्रसारित केला. अर्पण करू इच्छिणार्‍यांना संपर्कासाठी संबंधित संस्थेच्या संकेतस्थळाची मार्गिका (‘लिंक’) या संदेशात दिली होती. संकेतस्थळावर सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचे छायाचित्र, तसेच सनातन-निर्मित भगवान शिवाचे सात्त्विक चित्र यांचा वापर केलेला आहे. यासह सनातनच्या आश्रमातील लादीवर आपतत्त्वामुळे मनुष्याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते, त्याप्रमाणे सदर संस्थेच्या आश्रमातही होत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या संस्थेने आपल्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर अशा प्रकारे सादरीकरण केल्याने ‘सदर संस्था सनातन संस्थेशी निगडित आहे’, असा (अप)समज होतो. त्यामुळे ‘अर्पण देतांना जिज्ञासूंची दिशाभूल होऊ शकते’, असे काही हितचिंतकांनी आम्हाला कळवले आहे.

‘वरील प्रकारे सनातन-निर्मित संतांची छायाचित्रे आणि देवतेचे चित्र यांचा वापर करणार्‍या संस्थेचा सनातनशी काहीही संबंध नाही’, याची वाचक, हितचिंतक, जिज्ञासू आणि अर्पणदाते यांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे कुणी अर्पण मागत असल्यास त्यांच्यापासून सावध रहावे, तसेच त्याविषयी त्वरित कळवावे, ही नम्र विनंती !

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment