रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक कलाकृतींच्या संदर्भातील सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या संगणकांची आवश्यकता !

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘सनातन संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे व्यापक कार्य करत आहे. अध्यात्मप्रसाराचे सर्वोत्तम माध्यम असलेली ग्रंथसंपदा सनातन संस्थेने प्रकाशित केली आहे, तसेच धर्मकार्यासाठी उपयुक्त प्रसारसाहित्य (पत्रके, फलक) आणि सात्त्विक उत्पादने यांची निर्मिती केली आहे. साधक-कलाकार रंगसंगती, चित्र, संरचना, अक्षर अशा प्रत्येक घटकाचा सात्त्विकतेच्या दृष्टीने विचार करून आणि स्पंदनांच्या संदर्भात सूक्ष्मातील प्रयोग करून कलाकृतींची निर्मिती करतात. त्यामुळे ग्रंथांची मुखपृष्ठे, देवतांची चित्रे आणि मूर्ती, अक्षरे अन् अंक, उत्पादनांची वेष्टने, धर्मप्रसाराचे साहित्य यांच्या कलाकृती सात्त्विक झाल्या आहेत. कलाकृतींच्या या सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या पुढील संगणकांची तातडीने आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील संगणक खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था. (३.३.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment