सनातनच्या आश्रमांत विविध कार्यालयीन सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणार्‍या ‘ए फोर’, ‘ए थ्री’, तसेच ‘लीगल’ या आकारांतील पूर्ण कोरे कागद देऊन राष्ट्र-धर्म कार्यात हातभार लावा !

कागद उत्पादक आणि कागद विक्रेते यांना धर्मकार्यात हातभार लावण्याची सुसंधी !

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार यांसाठी कटीबद्ध असलेली सनातन संस्था नियतकालिक ‘सनातन प्रभात’, तसेच विविध विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करून हे कार्य करत आहे. नियतकालिक आणि ग्रंथ आदींच्या कार्यालयीन सेवांसाठी सनातनच्या आश्रमांत प्रतिदिन अनेक संगणकीय प्रती (प्रिंट) काढाव्या लागतात. यासाठी ७० जीएस्एम् (GSM) जाडीचे पूर्ण कोरे आणि पाठकोरे कागद वापरले जातात. प्रत्येक मासाला ‘ए फोर’ आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता असते.

सध्या भारतात कागद-निर्मिती करणारी अनेक आस्थापने आहेत. कागद उत्पादक, तसेच कागद विक्रेते यांनी सनातनच्या आश्रमासाठी ‘ए फोर’, ‘ए थ्री’, तसेच ‘लीगल’ या आकारांतील पूर्ण कोरे कागद विनामूल्य किंवा अल्प मूल्यात उपलब्ध करून द्यावेत, ही विनंती !

कागद अर्पण किंवा धनरूपात साहाय्य यासाठी इच्छुक असलेल्यांनी सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर वा [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.’

अनेक हितचिंतक आणि धर्मप्रेमी आपल्या व्यावसायिक व्यस्ततेमुळे या कार्यात स्वतः सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांनी, तसेच साधकांनी आपल्या परिचयातील कागद उत्पादक आणि कागद विक्रेते यांना संपर्क करून पूर्ण कोरे कागद अर्पण देण्याची विनंती करावी. त्यामुळे त्यांचाही या धर्मकार्यात सहभाग होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment