सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवसाची कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.
१. ‘सत्पात्रे दाना’चे महत्त्व !
‘सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे ! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. अक्षय्य तृतीयेला पुढीलप्रमाणे ‘सत्पात्रे दान’ करता येईल.
२. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य
करणार्या संस्था किंवा संघटना यांच्यासाठी धनदान करा !
सध्या धर्मग्लानीचा काळ आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदु समाज अधर्माचरणी बनला आहे. योग्य धर्मशिक्षण न दिल्याने हिंदूंचा धर्माभिमान नष्ट झाला आहे. धर्माची स्थिती अशी बिकट असतांना धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करणे, हे काळानुसार अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यामुळे धर्मप्रसार करणारे संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हे काळानुसार सर्वश्रेष्ठ दान होय. सनातन संस्था धर्मजागृतीचे हेच कार्य करत आहे. अर्पणदात्यांनी अशी संस्था किंवा संघटना यांना केलेल्या दानाचा (अर्पणाचा) विनियोग धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीच होणार आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दान करण्यास इच्छुक दात्यांनी स्वतःची माहिती कळवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
https://www.sanatan.org/en/donate येथेही दान (अर्पण) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.’

लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्यांची आवश्यकता !
सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा...
राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे...