कर्नाटकातील हासनंबादेवी

हासनंबादेवीचे मंदिर वर्षभरात केवळ काही दिवसच भाविकांसाठी उघडले जाते. या देवळाच्या गर्भगृहात लावलेला दिवा वर्षभर पेटत रहातो आणि देवीच्या मूर्तीला घातलेल्या हारातील फुले वर्षभर कोमेजत नाहीत.

हासनंबादेवीच्या मंदिरात होणार्‍या वर्षभरातील एकाच उत्सवाचे विज्ञापन करतांना या चमत्कारांची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली जाते. या उत्सवाला येणार्‍या भाविकांच्या संख्येत प्रतिवर्षी वाढ होत आहे. हासनंबादेवीचे मंदिर हे शासनाच्या धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात