अंनिस, तत्सम संघटना आणि पुरोगामी यांच्याकडून साजर्‍या केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त करण्यात आलेली टीका अन् त्यांचे खंडण

२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी टीका आणि बुद्धीभेद करणारी मते मांडली. सर्वत्रच्या हिंदूंना यातून बोध होऊन योग्य विचारप्रक्रिया कशी असायला हवी, हे लक्षात यावे, यासाठी टीका आणि काही चुकीच्या मतांविषयीचे खंडण येथे देत आहोत.

१. डॉ. जयंत नारळीकर यांची अतार्किक विधाने

अ. भगवद्गीतेत एक श्‍लोक आहे –

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ।

अर्थात श्रीकृष्ण सांगतो की, हे ज्ञान मी तुला (अर्जुनाला) दिले; पण यावर तू विचार कर आणि मग तुला काय करायचे आहे ते ठरव. हा भाग मला वैज्ञानिक दृष्टीकोनाची प्रस्तावना करायला योग्य वाटतो. (‘देव काल्पनिक आहे’, असे म्हणणारेच आता श्रीकृष्णाने सांगितलेले श्‍लोक वाचून सांगत आहेत ! असे असेल, तर भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व नारळीकर मान्य करतील का ? – संपादक)

आ. अनेकदा आपण वैज्ञानिक दृष्टीकोन डावलून कुठलीतरी पूर्वीची कल्पना राबवत असतो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिसर्च मध्ये असतांना मी पाहिले होते की, बी.ए.आर्.सी. आणि टी.आय.एफ्.आर्. या संस्थांमध्ये विश्‍वकर्मा जयंतीच्या दिवशी यंत्रांची पूजा करत. (भगवान विश्‍वकर्मा हे देवतांचे वास्तूकलातज्ञ आहेत. त्याची पूजा संशोधकांनी करण्यात गैर काय ? पूजेचा यंत्र आणि वातावरण यांवर होणारा परिणाम पडताळायला हवा, असा वैज्ञानिक दृष्टीकोन नारळीकर यांनी ठेवला असता, तर बहुधा त्यांना पूजेचे महत्त्व कळले असते ! – संपादक)

२. अध्यात्म, ज्योतिष यांचा अभ्यास नसणारे सत्यजित रथ !

अ. ‘क्व सूर्य प्रभवो वंश : क्व चाल्पविषया मति: तितीर्षु दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् ॥’

कुठे तो सूर्योत्पन्न वंश (रघुवंश) आणि कुठे माझी अल्पमती ! आम्ही आमचे प्रश्‍न सोडवण्यासाठी रघुवंशाची वाट पहायची का ? (सूर्य कुलोत्पन्न रघुवंशाविषयी महान कवी संत कालिदास यांनी त्यांचा भाव व्यक्त केला आहे. हे समजण्यासाठी भावस्थिती अनुभवणे आवश्यक आहे. – संपादक)

आ. शोषकांनी वैज्ञानिकता कह्यात घेऊन आम्हाला त्याच्यापासून तोडले आणि आम्हाला देवळं, कुंडल्या दिल्या. (आज अनेक विदेशी शास्त्रज्ञ भारतात येऊन मंदिरे, ज्योतिषशास्त्र यांविषयीचे संशोधन आणि अभ्यास करत खरा वैज्ञानिक दृष्टीकोन जपत आहेत. ‘बुद्धी आणि मन यांची चौकट आखून त्याबाहेर पडायचेच नाही’, असे ठरवल्यावर मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडे असलेल्या अध्यात्मशास्त्राची व्यापकता कशी लक्षात येईल ? प्राचीन इतिहासात अनेक शोध हिंदूंच्या ऋषि-मुनींनी लावले आहेत, याचे पुरावे अद्यापही सापडतात. असे असले तरी ज्यांची बुद्धी विदेशींच्या दावणीला बांधली आहे, त्यांना महान भारतीय परंपरा काय समजणार ? – संपादक)

३. वैज्ञानिकतेचा बुरखा पांघरून दैवी अस्तित्व नाकारणार्‍या मुक्ता दाभोलकर यांची विधाने

‘विसर्जित गणेशमूर्ती दान करा’ या उपक्रमामुळे २ लाख ६० सहस्र गणेशमूर्ती मुळे-मुठेत पडण्यापासून वाचल्या. (‘विसर्जन’ या धार्मिक कृतीच्या विरोधात ‘मूर्ती पाण्यात पडण्यापासून वाचवणे’ ही अधार्मिक कृती राबवणारे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तीला अभ्यासहीनपणे प्रोत्साहन देणारे (म्हणे) वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवत आहेत, हेच हास्यास्पद आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment