(म्हणे) ‘श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा गरजूंना वह्या आणि लेखणी अर्पण करा !’

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून धर्मद्रोही आवाहन !

सांगली – गणपतीला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्याऐवजी झोपडपट्टीतील गरजूंना वाटता येण्यासाठी वह्या अर्पण करा !, असे धर्मद्रोही आवाहन करणारा संदेश गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक प्रसारमाध्यमांत फिरत आहे. (‘बकरी ईदला बकर्‍या कापू नका. त्याऐवजी गरजूंना वह्या आणि लेखणी द्या’, असे आवाहन कधी केले जाते का ? श्रीगणेशाला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्यामागचे शास्त्र अन् त्याचे आध्यात्मिक लाभ न जाणता शास्त्रविसंगत आवाहन केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे ! – संपादक)

या संदेशात पुढे म्हटले आहे की, गणेशोत्सवात जो कोणी घरी गणेशमूर्ती आणेल, त्यांनी श्रींच्या दर्शनाला येणार्‍यांना श्रींसाठी फुले, फळे आणि नैवेद्य (गोड पदार्थ) घेऊन येण्यापेक्षा वह्या आणि लेखणी घेऊन येण्यास सांगावे. या वह्या आणि लेखणी पुढे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किंवा झोपडपट्टीतील गरजवंतांना वाटता येईल. असे करणे हे एक चांगले काम आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment