गोमूत्र प्राशन केल्याने १० वर्षांपासून असणारे मद्यपानाचे व्यसन सुटणे

१. आर्थिक टंचाईमुळे पानपट्टीवर मद्यविक्री चालू करणे
आणि आर्थिक परिस्थिती न सुधारता मद्यपानाचे व्यसन लागणे

sanjiv_ja_odisha_200
श्री. संजीव झा

‘१५ वर्षांपूर्वी माझे पानपट्टीचे दुकान होते. आर्थिक टंचाईमुळे मी तेथे मद्यही विकू लागलो. त्यामुळे माझी आर्थिक स्थिती काही सुधारली नाही; परंतु मला मद्यपानाचे व्यसन लागले. १० वर्षे मी प्रतिदिन १८० मि.ली. मद्य घेत होतो. मला त्याची जाणीव झाल्यावर ‘आजपासून मी पिणार नाही’, असा विचार करत होतो; परंतु रात्र होताच मी मद्य घेत होतो. मद्य पिण्याच्या सवयीमुळे मला मांसाहार करण्याचीही सवय लागली होती. शाकाहारी जेवण घेण्याची इच्छाच होत नव्हती.

 

 

२. अर्धा पेला गोमूत्र प्राशन केल्याने अर्ध्या घंट्यात पोट साफ
होणे आणि १० ते १५ दिवसांनी हळूहळू मद्यपानाचे व्यसन आणि मांसाहाराची सवय सुटणे

एक दिवस माझ्या मित्राने मला देशी गायीचे गोमूत्र पिण्यासाठी आग्रह केला. मी त्याला सांगितले, ‘‘मला काहीही अडचण नाही. मग मी कशासाठी गोमूत्र घेऊ ?’’ त्याच्या आग्रहास्तव मी अर्धा पेला गोमूत्र प्यायलो. अर्ध्या घंट्यात माझे पोट साफ झाले. नंतर मी प्रतिदिन गोमूत्र पिऊ लागलो. १० ते १५ दिवसांनंतर माझे मद्यपानाचे व्यसन हळूहळू सुटले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मद्यपान स्वास्थ्यासाठी चांगले नाही आणि विक्री करणेही योग्य नाही.’ त्याचसमवेत माझा मांसाहारही सुटला.

 

३. शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या एका वेळी दूर करणारे औषध गोमूत्र असणे

गोमूत्राने मोठे आजारही बरे होतात, उदा. कर्करोग, दमा, मधुमेह इत्यादी. मला कोणताही आजार नव्हता; परंतु मद्यपानामुळे निर्माण झालेला मानसिक ताण आणि अन्य समस्याही दूर झाल्या. शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या एकाच वेळी बरे करणारे जगात एकही औषध नाही. गोमूत्र हे एकच असे औषध आहे, जे दोन्ही त्रासांवर एकाच वेळी प्रभाव करू शकते, असे मला जाणवले. मी सर्व वैद्यांना सांगू इच्छितो, ‘सर्व असाध्य व्याधींनी ग्रसित रुग्णांना गोमूत्र पिण्याचा समुपदेश अवश्य द्या.’ आता माझे मद्यपानाचे व्यसन पूर्णतः सुटलेे आहे. चुकून जरी मद्यपान केले, तरी मला मळमळते.’

– श्री. संजीव झा, बीरमित्रापुर, ओडिशा

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात