वाराणसी : राममंदिराची उभारणी कोणतेही सरकार करणार नाही. त्याची उभारणी संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच करतील, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले, धनुष्यबाण हातात घेतलेल्या भगवान श्रीरामाचे चित्र दाखवून अयोध्येत राममंदिर बनवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत; परंतु अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाल्याने तेथे बालक रामाचीच स्थापन केली जाईल.
नोटाबंदीचा काळ्या पैशांवर परिणाम नाही !
नोटाबंदीविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शंकराचार्य म्हणाले, आतंकवाद, बनावट नोटा, भ्रष्टाचार आणि काळा पैसा समाप्त करण्याचा दावा करत नोटाबंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र याचा काळ्या पैशांवर कोणताही परिणाम झालेला नाही.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !