तमोगुणाचा प्रभाव न्यून करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांत सात्त्विक परिवर्तन करणारी सात्त्विक उत्पादने !

Udpadane

१. व्यक्तीचे आचरण हे  त्याचे संस्कार आणि
त्याच्यातील सत्त्व-रज-तम या त्रिगुणांवर अवलंबून असणे

व्यक्तीचे आचरण त्याचे संस्कार आणि त्याच्यातील सत्त्व-रज-तम हे त्रिगुण यांवर अवलंबून असते, उदा. सामान्य स्थितीत भांडी घासतांना होणारा भांड्यांचा आवाज आणि राग आल्यानंतर होणारा आवाज यांत पालट होतो. याचे कारण राग येतो, तेव्हा व्यक्तीत विकार आणि तमोगुण वाढतो.

२. तामसी वस्तूंच्या वापराने व्यक्तीमध्ये
तमोगुणाचा प्रभाव वाढून अनैतिकता, अपराध यांत वृद्धी होणे

सध्या बाजारात विविध बॉडी स्प्रे मिळतात. त्यात पुरुषांसाठी वेगळे आणि स्त्रियांसाठी वेगळे असतात. स्त्री-पुरुषांना एकमेकांचे कोणते गंध आवडतात, या भोगवादी विचारांवर आधारित त्यांची निर्मिती केलेली असते. असे एकमेकांना हुंगून प्रेम करणार्‍या पशूतुल्य तामसी वस्तूंच्या वापराने व्यक्तीमध्ये तमोगुणाचा प्रभाव वाढतो. समाजात अनैतिकता, अपराध यांची वाढ होते.

३. व्यक्तीत चांगले पालट करायचे असतील,
तर तिच्यातील सत्त्वगुणाचे वर्धन करणे आवश्यक !

सध्या तमोगुण वाढवणार्‍या अज्ञानी विचारांचा प्रभाव सर्वत्र वाढला आहे. अशा वेळी व्यक्तीत चांगले पालट करायचे असतील, तर तिच्या संस्कारांसह तिच्यामध्ये सत्त्वगुण वाढवणे आवश्यक आहे. यासाठी व्यक्तीने साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात धर्मशिक्षण आणि सत्त्वगुण यांच्या अभावामुळे व्यक्तीकडून योग्य साधना, तसेच धर्माचरण होत नाही.

४. देवतांची तत्त्वे आणि चैतन्य देणार्‍या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व !

देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या गोअर्क, कापूर, उदबत्ती आदी सात्त्विक उत्पादनांच्या वापरामुळे व्यक्तीला चैतन्य आणि देवतांची तत्त्वे यांचा लाभ होतो. यांच्या नित्य वापरामुळे व्यक्तीतील तमोगुण न्यून होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीने धर्माचरण करण्यासाठीही यांचे साहाय्य होते. याद्वारे व्यक्ती आणि समाज यांत सात्त्विक परिवर्तन होऊ शकते. सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांच्या वापराचाही अनेक भाविकांना लाभ होत असून पुष्कळ लोकांनी स्वतःत झालेले चांगले पालट अनुभवले आहेत.
– श्री. प्रसाद म्हैसकर, रत्नागिरी (२९.७.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात