परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वसंमोहन उपचारांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी
सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १६ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग १)

-manovikar1

प्रस्तूत ग्रंथात मनोविकारांवरील उपचार पद्धती, संमोहन उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये आदींचा उहापोह केला आहे. या ग्रंथात स्वसंमोहनशास्त्राचा वापर करून झोपेत बोलण्याची सवय, न्यूनगंड, भीती आदी मनोविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणे दिली असून व्यसनमुक्त होण्यासाठी आणि परीक्षेतील अपयशावर मात करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (भाग २)

manovikar2

या ग्रंथात संमोहनशास्त्राचा वापर करून रुग्णावर किंवा स्वतःवर टप्प्याटप्प्याने उपचार करण्याची पद्धत, उपचारातील चढ-उतार, उपचाराची काळानुसार फलनिष्पत्ती आदींविषयी सविस्तर विवरण दिले आहे. निरर्थक विचारध्यास (ऑब्सेशन), निरर्थक कृतीविषयी अट्टाहास (मंत्रचाळेपणा अर्थात् कम्पल्शन) आदी मनोविकार असलेल्या अन् आत्महत्येचे विचार मनात येणार्‍या रुग्णांवर उपचार केल्याची सविस्तर उदाहरणेही या ग्रंथात दिली आहेत.

सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

संपर्क : गोवा – (०८३२) २३१५९१९, पनवेल – (०२१४३) २३३१२०

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात