देव आहे विश्‍वंभर !

Shalini_Marathe1Col
सौ. शालिनी मराठे

एक बुद्धीवादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला म्हणाली, तुमचा देव गाभार्‍यात बसून नैवेद्य खाण्याविना काय काम करतो ? हे वाक्य ऐकून मला त्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव कराविशी वाटली; कारण देव काय काय करतो, ते शब्दांत सांगणे अशक्यच आहे. तेव्हा देवाने मला पुढील ओळी सुचवल्या.

देव पाडतो पाऊस ।
देव धाडतो थंडी-ऊन ।
देव भागवितो भूक ।
देव शमवितो तहान ॥ १ ॥

देव पिकवितो शेत ।
देव वाढवितो झाड ।
देव फुलवितो फूल ।
देव आनंदनिधान ॥ २ ॥

देवाची अगाध करणी ।
नारळात असते पाणी ।
देवाच्या कृपेनेच ।
युगेयुगे फिरते धरणी (टीप) ॥ ३ ॥

देव देतो जन्म ।
देव खोटा म्हणू नये ।
देव देतो श्‍वास ।
देवाला कधी विसरू नये ॥ ४ ॥

देव दयेचा सागर ।
देव करुणेचा पाझर ।
देव विश्‍वाचा आधार ।
देव आहे विश्‍वंभर ॥ ५ ॥

टीप – पृथ्वी

काही बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी म्हणतात, देवाला रिटायर्ड (सेवानिवृत्त) करायला हवे. देवाला सेवानिवृत्त करणारे तुम्ही कोण ? सेवानिवृृत्त करायला तुम्ही देवाला पगारी चाकर म्हणून कामावर ठेवले आहे का ? आणि देव रिटायर्ड झाल्यावर तो करत असलेली कामे तुम्ही करू शकणार का ? बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगाम्यांनो, देवाविना तुम्हाला अस्तित्व तरी आहे का ?, याचा विचार अवश्य करा आणि नंतरच स्वतःची बुद्धी पाजळा !

– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, गोवा. (२०.५.२०१६)