
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या वचनाची आश्रमाच्या विश्वस्तांना आली प्रचीती !
अहिल्यानगर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते ४ सप्टेंबरला दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी भगवान श्री गोपाळकृष्णाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मंगल विधी पार पडला. हा सोहळा अहिल्यानगर येथील थोरले श्रीराममंदिर, नेप्ती आश्रम येथे पार पडला. या वेळी त्यांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि अन्य विधीही भावपूर्णरित्या पार पडले. याप्रसंगी भगवान श्री गोपाळकृष्णाच्या चरणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होऊन लवकरात लवकर रामराज्य स्थापन व्हावे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि सर्वत्रच्या साधकांना होत असलेले आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, अशी भावपूर्ण प्रार्थना केली.

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीमुळे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या सर्व भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. अनेक भक्तगण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भावपूर्ण नमस्कार करत होते.
आश्रमाचे विश्वस्त डॉ. सी.बी. कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते करावी ? यासंदर्भात मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सुचवत होते, ‘ती योग्य व्यक्तीच्या हस्तेच होणार आहे’. त्याप्रमाणे हा सोहळा पार पडल्यानंतर मला त्याची अनुभूती आली.’

डॉ. सी.बी. कुलकर्णी यांचा परिचयडॉ. सी.बी. कुलकर्णी हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या नेप्ती येथील थोरले श्रीराम मंदिराचे अध्यक्ष आहेत. अहिल्यानगर परिसरात या मंदिराचा मोठा भक्त परिवार आहे. डॉ. कुलकर्णी हे शहरातील चिंतामणी रुग्णालयातील प्रसिद्ध पोटविकारतज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) गौरी कुलकर्णी या शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ असून सध्या त्या मंदिराचे व्यवस्थापनही पहात आहेत. त्यांचे सुपुत्र डॉ. गौरव कुलकर्णी आणि स्नुषा डॉ. गायत्री कुलकर्णी या आहेत. सध्या दोघे पती-पत्नी चिंतामणी रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. |
या सोहळ्याच्या अंतर्गत प.पू. आचार्य डॉ. सुनीलदादा लुले यांचे ‘श्रीमद्भगवद्गीता’ या विषयावर प्रवचन झाले. प.पू. आचार्या माधुरीताई जोशी यांनी श्रीकृष्ण भागवत ज्ञानकथा सांगितली. रात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा पाळणा म्हणून सोहळ्याची सांगता झाली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नेप्ती आश्रम परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भक्त परिवार, तसेच सनातन संस्थेचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांनी भगवान श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंगल सोहळ्यात श्रद्धेने सहभाग घेतला. सोहळ्यानंतर सर्व साधक, भक्तांनी महाप्रसादरूपी फराळ ग्रहण केला.
नेप्ती आश्रम हे भगवान श्री गोपाळकृष्णाचे पावन स्थान हे श्रद्धेचे केंद्र ठरणार ! – डॉ. सी.बी. कुलकर्णी, विश्वस्तसमर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पार पडलेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे नेप्ती आश्रमाच्या आध्यात्मिक वातावरणात अधिक चैतन्य निर्माण झाले आहे. हे पावन स्थान भक्तांसाठी भगवान श्री गोपाळकृष्णाचे श्रद्धेचे केंद्र ठरणार आहे. |
सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
नाशिक कुंभमेळ्याच्या भव्य धर्मध्वज नगर परिक्रमेचे सनातन संस्थेने केले स्वागत !
प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !
दीपावलीनिमित्त SanatanShop.com वर २५ % पर्यंत विशेष सवलत !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले...