गोवा पुस्तक मेळावा
पणजी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील गोवा पुस्तक मेळाव्यात आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक सत्रात सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. सचिन पिळगावकर सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर सनातन संस्थेचे साधक श्री. नारायण नाडकर्णी यांनी श्री. पिळगावकर यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी त्यांना सनातन संस्था आणि संस्थेचे भारतभर चालू असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य यांविषयी माहिती देण्यात आली. त्यांनतर त्यांना रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. संस्थेच्या कार्याला श्री. सचिन पिळगावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आश्रमात येण्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करत, ‘पुढच्या गोवा भेटीत मी निश्चितपणे सनातन आश्रमाला भेट देईन’, असे सांगितले. या वेळी सचिन पिळगावकर यांना सनातनचा ‘इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.
८ फेब्रुवारी या दिवशी गोवा विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनी गोवा पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. नारायण नाडकर्णी, साधिका सौ. शुभा सावंत, तसेच हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी उपस्थित होते.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !