नामजप करतांना श्‍वासाकडे लक्ष, अस्तित्वाची जाणीव आणि पुढे अस्तित्वही न रहाणे अशी प्रत्येक टप्प्याची अनुभूती ईश्‍वराने देणे

१. नामजप करत असतांना नामजप बंद पडून श्‍वासावर लक्ष केंद्रित होणे

१०.१.२०१६ या दिवशी सकाळी १० वाजता मी नामजप करत असतांना काही वेळाने हळूहळू माझा नामजप बंद पडला आणि श्‍वासाकडे लक्ष देण्याची क्रिया आपोआप चालू झाली.

 

२. देहाची जाणीव नष्ट होऊन केवळ अस्तित्व जाणवणे आणि शांत वाटणे

Dinesh_Shinde
श्री. दिनेश शिंदे

हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्‍वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला. पुढच्या क्षणी माझ्या देहाची जाणीव नाहीशी झाली आणि तेथे केवळ अस्तित्व होते आणि शांत वाटत होते. या स्थितीत मी नामजप करायचा आणि श्‍वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला, तर या दोन्हीपैकी काहीही न होता मला केवळ अस्तित्व जाणवत होते आणि याच स्थितीत रहावेसे वाटत होते.

 

 

३. सर्व देहांची तीव्रता अल्प झाल्यावर
जिवाचे अस्तित्वही नाहिसे होऊन जीव शिवस्वरूप होणे

या स्थितीत असतांना हे अस्तित्व कशामुळे जाणवत आहे ?, असा विचार आला. तेव्हा ईश्‍वराने इतर जे देह आहेत, त्यांचे अस्तित्व असल्यामुळे अस्तित्वाची जाणीव होत आहे. सर्व देहांची तीव्रता जसजशी अल्प होत जाते, तसतशी अस्तित्वाची जाणीवही हळूहळू अल्प होत जाते आणि एक क्षण असा येतो की, सर्व देहांचे अस्तित्व नाहिसे होते आणि जिवाचे अस्तित्वही नाहिसे होते, म्हणजे जीव हा शिवस्वरूप होतो, असा विचार दिला.

प.पू. गुरुदेवांनी आणि ईश्‍वराने प्रत्येक टप्प्याची अनुभूती दिली. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०१६)

(भाव तेथे देव यानुसार आलेल्या अनुभूती या वैयक्तिक आहे. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात