शतावरी चूर्ण वटी (गोळ्या)

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

शतावरी हे आयुर्वेदातील एक उत्कृष्ट शक्तीवर्धक (टॉनिक) औषध आहे.

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे आयुर्वेदातील एक उत्कृष्ट शक्तीवर्धक (टॉनिक) औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
थकवा, शरीर कृश असणे, मूत्रमार्गाची जळजळ, लघवी अल्प होणे (उन्हाळे लागणे), आम्लपित्त, उष्णतेचे विकार, रक्तप्रदर (योनीमार्गातून जास्त रक्तस्राव होणे), श्‍वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) या विकारांत, तसेच वीर्यवृद्धीसाठी, गर्भाशयाला बळ मिळण्यासाठी आणि स्तनपान देणार्‍या मातांना भरपूर दूध येण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी २ – ३ गोळ्या १ वाटी गरम दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्याव्यात. हे औषध घेण्यापूर्वी, तसेच घेतल्यावर साधारण १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. ३ मास

 

२. सूचना

अ. गोळी चावून किंवा चूर्ण करून घेतल्यास तिची परिणामकारकता वाढते.

आ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात गोळ्यांचे चूर्ण घ्यावे.

 

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’

–  वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment