हिंदु धर्म सर्वांना जोडतो, तर ‘रिलीजन’ एकमेकांशी संबंध तोडतो !

Article also available in :

हिंदु धर्म : जगाला मिळालेली अद्भुत देणगी ! 

 

१. धर्माचा अर्थ ‘रिलीजन’ असा नाही !

‘युरोप आणि अमेरिका इत्यादी पाश्‍चात्त्य देशांमध्ये ‘धर्म’ अशी कोणतीही संकल्पना नाही. तेथे ‘रिलीजन’ आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद ‘रिलीजन’ असा केला. भारताच्या बुद्धीवादी लोकांनी ते मान्य केले. येथूनच खर्‍या समस्येला आरंभ झाला. या समस्येने आता विक्राळ रूप धारण केले आहे. इंग्रजांना तर कळत नव्हतेच; पण भारतातील ज्ञानी लोकांच्या बुद्धीवरही पडदा पडला होता आणि त्यांनीही ‘रिलीजन’चा अर्थ ‘धर्म’ असा केला. त्यामुळे ‘धर्म आणि रिलीजन यांमध्ये आकाश अन् पाताळ एवढेे अंतर आहे’, हे व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे. रिलीजन ही लहानशी टेकडी आहे, तर धर्म हा विशाल पर्वत आहे. ‘रिलीजन ‘गंगू तेली’ आहे, तर धर्म ‘राजा भोज’ आहे.’

रिलीजनला योग्य समानार्थी शब्द ‘पंथ’ असा आहे. अन्य समानार्थी शब्द ‘संप्रदाय’, ‘मत’, ‘पंथ’ इत्यादी आहेत; परंतु रिलीजनचा अर्थ धर्म असा नक्कीच नाही. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज यांच्या शब्दकोशांत प्रत्येक वर्षी अन्य भाषांमधील काही शब्दांना इंग्रजी भाषेमध्ये समाविष्ट केले जाते. त्याच प्रकारे ‘रिलीजन’, ‘नेशन’, ‘सेक्युलर’, ‘कल्चर’ इत्यादी शब्दांनाही आता हिंदी भाषेमध्ये आत्मसात करायला पाहिजे; कारण की हिंदी भाषेमध्ये या शब्दांचा योग्यरित्या अर्थ सांगणारा दुसरा कोणताही शब्द नाही.

 

२. रिलीजन आणि धर्म यांच्यातील स्पष्ट भेद

रिलीजनचा संबंध पूजा किंवा उपासनापद्धत यांच्याशी आहे, तर धर्म हा संपूर्ण सृष्टीची चिंता करतो. रिलीजन आपापसांत संघर्ष उत्पन्न करतो, तर धर्म सर्वांमध्ये सामंजस्य किंवा एकोपा यांचे वातावरण निर्माण करतो. रिलीजन कट्टरतेला जन्म देतो आणि धर्म उदारतेचे वातावरण निर्माण करतो. रिलीजन हा मनुष्यांमध्ये भेद निर्माण करतो आणि धर्म समस्त सृष्टीच्या कल्याणाच्या दिशेने, अद्वैताकडे जाण्यास प्रेरणा देतो.

 

३. रिलीजन काय आहे ?

व्यक्ती किंवा समाज ज्या ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतो आणि त्याची तो ज्या प्रकारे पूजा-आराधना करतो, तर तो त्याचा ‘रिलीजन’ आहे. त्यामुळे रिलीजनला ‘उपासनापद्धत’ असेही म्हटले जाते. एखादा थोर महापुरुष सांगतो की, ‘आपल्या म्हणण्यानुसार चालल्यावर व्यक्तीला मोक्ष प्राप्त होईल.’ त्या थोर महापुरुषाच्या अनुयायांच्या कायम स्मरणात रहावे, यासाठी त्यांचे उपदेश किंवा वाक्ये लिहून घेतली जातात आणि त्यांना पुस्तक किंवा ग्रंथ यांचे स्वरूप दिले जाते. यासमवेतच तो महापुरुष किंवा प्रेषित, ईशदूत किंवा ईश्‍वर यांची पूजा करण्याची पद्धत सुनिश्‍चित होते. अशा प्रकारे एका नव्या रिलीजनचा जन्म होतो.

रिलीजनसाठी ४ आवश्यक तत्त्वे असतात. एक तर प्रेषित, उपदेशक किंवा प्रवर्तक. दुसरे तत्त्व म्हणजे एक ग्रंथ, ज्यामध्ये प्रवर्तकाचे उपदेश आणि त्याचे जीवनदर्शन इत्यादी माहिती असते. रिलीजनचे तिसरे तत्त्व आहे पूजा-आराधनेची एक ठरलेली पद्धत आणि चौथे तत्त्व आहे आराधनेची फलप्राप्ती, उदा. प्रेषित (पैगंबर) महंमद इस्लामचे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी इस्लाम रिलीजनचा आरंभ केला. ‘कुराण’ हा इस्लामला मानणार्‍यांसाठी पवित्र ग्रंथ आहे. ज्यामध्ये महंमद साहेब यांची शिकवण दिलेली आहे. मशिदीमध्ये नमाज पढण्याची एक ठराविक पद्धत आहे. त्या उपासनेची फलप्राप्ती जन्नत, म्हणजे स्वर्गप्राप्तीच्या रूपात होते.

अशाच प्रकारे ख्रिश्‍चन रिलीजनचे प्रवर्तक, प्रेषित किंवा उपदेशक ईसा मसीहा हे आहेत. बायबल हा पवित्र ग्रंथ आहे, ज्याला मानणे किंवा वाचणे आवश्यक आहे. चर्चमध्ये जाणे, ही त्यांच्या उपासनेची पद्धत आहे आणि या सर्वांचा परिणाम ‘हेवन’प्राप्तीच्या (स्वर्गप्राप्तीच्या) रूपात होतो.

यहुदी रिलीजनचे प्रवर्तक मोझेस किंवा मूसा हे आहेत. ‘टोराह’ हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे आणि ‘सायनेगॉग’मध्ये जाणे, ही त्यांची उपासना पद्धत आहे.

पारसी पंथाचे प्रथम पुरुष ‘जरथुस्त्र’ हे असून त्यांचा पवित्र ग्रंथ ‘जेंस्दावेस्ता’ हा आहे आणि अग्नीची पूजा करणे, ही त्यांची निश्‍चित उपासना पद्धत आहे. बौद्धांसाठी क्रमश: गौतम बुद्ध, त्रिपिटक आणि बौद्ध मठांमध्ये आराधना करणे, ही ३ तत्त्वे आहेत. शीख रिलीजनचा आरंभ पूज्य गुरुनानक देव यांनी केला. ‘श्रीगुरु ग्रंथसाहेब’ हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे आणि गुरुद्वारामध्ये उपासना करणे, ही त्यांची एक ठराविक पूजापद्धत आहे. वैष्णव, शैव, वीरशैव इत्यादी याच प्रकारचे रिलीजन आहेत.

हे स्पष्ट आहे की, कुणा महापुरुषाने दाखवलेल्या मार्गावरून जातांना जेव्हा एखादा जनसमूह नवीन आचार, विचार, नवीन उपासना पद्धत आत्मसात करतो, तेव्हा त्या रिलीजनचा उदय होतो. पारसी, यहुदी, ख्रिश्‍चन, इस्लाम, बौद्ध, जैन, शीख, वैष्णव, शैव इत्यादी सर्व रिलीजन आहेत; परंतु ‘हिंदु’ नावाचा कोणताही रिलीजन नाही.

 

४. धर्म काय आहे ?

धर्म जर ‘रिलीजन’ नाही, धर्म कोणता संप्रदाय किंवा मजहब, मत किंवा पंथ नाही, तर मग धर्म म्हणजे नक्की काय आहे ? वस्तुतः धर्म अनेकांकडून अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न झाला आहे. काही विद्वान, ऋषि-महर्षि म्हणतात की, ‘जो धारण करता येतो, तो म्हणजे ‘धर्म’ !’ अनेक ग्रंथांमध्ये क्षमा, धैर्य, चोरी न करणे, इंद्रियनिग्रह करणे इत्यादी धर्माची १० लक्षणे सांगितली गेली आहेत. कुठे स्वभावालाच ‘धर्म’ म्हटले आहे, उदा. अग्नीचा धर्म जाळणे आहे, पाण्याचा धर्म वहाणे आहे इत्यादी. पत्नी धर्म, पती धर्म, संतान (पुत्र) धर्म, व्यक्ती धर्म, समाज धर्म आणि राष्ट्र धर्म यांचा उल्लेखही वारंवार केला जातो. कधी धर्मसंकटाचा विषय येतो, कधी आपद्धर्माची चर्चा होते. त्यामुळे धर्माचा योग्य अर्थ समजणे कठीण होऊन जाते. धर्माची एक विशिष्ट व्याख्याही करता येत नाही; कारण धर्म सनातन आहे. हे कुणीही सांगू शकत नाही की, ‘धर्माचा आरंभ कुठे आणि कधीपासून झाला आहे ?’

तरीही धर्माची व्याख्या करण्याचा, त्याची परिभाषा सांगण्याचा एक प्रयत्न केला जाऊ शकतो. आमच्या या सृष्टीमध्ये अनेक विविधता आहेत, नानाविध गोष्टी आहेत. ‘सृष्टीची विविधता राखतांना आणि यांमध्ये सामंजस्य स्थापित करतांना सृष्टीचा विकास ज्या शाश्‍वत सिद्धांतांमुळे होतो, त्याला ‘धर्म’ म्हटले जाते.’ अर्थात् धर्म संपूर्ण सृष्टीशी, चराचर विश्‍वाशी संबंधित आहे. कोणत्या एका जनसमुदायाशी जोडलेला नाही. याला हिंदु धर्म यासाठीच म्हटले जाते की, हिंदु समाजाच्या इच्छेने (मनीषेने) याचा आविष्कार केला आहे. तसे पहाता हा मानव धर्म आहे आणि सनातन काळापासून अस्तित्वात आहे. याला ‘हिंदु धर्म’ म्हणा, ‘मानव धर्म’ म्हणा किंवा ‘सनातन धर्म’ म्हटले, तरी ते एकच आहे. धर्म संपूर्ण सृष्टी, चराचर विश्‍व यांच्याशी संबंधित आहे. कोणत्याही एका जनसमुदायाशी जोडलेला नाही; म्हणून तो ‘मानव धर्म’ आहे. सनातन काळापासून हे चालत आलेले आहे; म्हणून तो ‘सनातन धर्म ’आहे.

 

५. सहजीवनाचे शाश्‍वत सिद्धांत !

या सृृष्टीमध्येही काही सत्ता आहेत. पहिली सत्ता व्यक्ती आहे. नंतर समाज आहे. एक सत्ता संपूर्ण सृष्टी आहे आणि एक सत्ता ईश्‍वराचीही आहे. ज्या शाश्‍वत सिद्धांतांच्या आधारावर व्यक्ती, समाज, सृष्टी आणि ईश्‍वर परस्पर एक दुसर्‍याला सहकार्य करतांना सामंजस्यासह आपला संपूर्ण विकास करू शकेल, ते शाश्‍वत सिद्धांतच ‘धर्म’ आहेत. येथे ईश्‍वराचा अर्थ रिलीजनशी आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ईश्‍वराविषयी श्रद्धा ठेवते. त्याची उपासना करते. निरीश्‍वरवाद्यांची श्रद्धा ईश्‍वरावर नाही, तर तर्क, विज्ञान यांवर  असते.

पाश्‍चात्त्य जग किंवा पाश्‍चात्त्य विचारवंत दार्शनिक व्यक्ती, समाज, सृष्टी आणि रिलीजन यांच्यामध्ये कसलाच ताळमेळ बसवू शकले नाहीत, मग चारही सत्तांमध्ये सामंजस्य असणे, ही तर पुष्कळ लांबची गोष्ट आहे. आतापर्यंत युरोपीय विद्वान हे व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये होणार्‍या संघर्षालाच मिटवू शकले नाहीत. जेव्हा व्यक्तीला अधिक महत्त्व मिळते, सर्वकाही करण्याची मुभा मिळते, तेव्हा समाज तुटायला आरंभ होतो. अनियंत्रित व्यक्ती समाजाच्या मूल्यांवर राक्षसी बळ प्राप्त करते आणि नंतर आपल्याच समाजाच्या लोकांचे शोषण अन् त्यांचा छळ करायला प्रारंभ करते. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये हेच होते.

यामुळे व्यथित होऊन कार्लमार्क्स याने कामगारांच्या हुकूमशाहीची गोष्ट केली आणि समाजाला सर्वशक्तीमान बनवले. या साम्यवादी व्यवस्थेमध्ये व्यक्ती यंत्राचा सुटा भाग होऊन गेला. सर्व लोक एकसमान होण्याऐवजी काही लोक इतर लोकांहून अधिक समान झाले.

 

७. रिलीजनच्या नावाखाली नरसंहार करणे

इतिहासामध्ये जेवढे अत्याचार, जेवढा नरसंहार झाला, तेवढा अन्य कोणत्याही काळात झाला नाही. हीच स्थिती रिलीजनच्या संबंधात आहे. एक व्यक्ती किंवा समाज ज्या रिलीजनला मानत आहे, त्याला तो श्रेष्ठ समजतो. ख्रिस्ती समजतात की, ‘ख्रिस्ताच्या मार्गावरून चालल्यामुळे जगातील लोकांचे कल्याण होऊ शकते.’ त्यामुळे त्यांचे ध्येय ‘संपूर्ण जगाला ख्रिस्ती बनवणे’, हे आहे आणि यासाठी ते बळ, आमीष, फसवणूक इत्यादी सर्व मार्गांचा आधार घेत आहेत. लॅटीन (दक्षिण) अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी भागांमध्ये ख्रिस्ती मतावलंबियांनी ख्रिश्‍चनता लादण्यासाठी जो रक्तपात केला, त्याचा काळाकुट्ट इतिहास सर्वांना ठाऊक आहे.

याच प्रकारे इस्लामला मानणारेही असे समजतात, ‘केवळ मुसलमानांनाच जन्नत (स्वर्ग) मिळू शकतो. जो मुसलमान नाही, तो काफीर आहे आणि काफिरांना जगण्याचा कोणताच अधिकार नाही.’ त्यामुळे इस्लामला मानणारे संपूर्ण जगाला दारुल-इस्लाम, म्हणजे इस्लामची भूमी बनवण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. मध्यकाळात ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यामध्ये अनेक क्रूसेड (धर्मयुद्धे) झाली. मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया, भारत, पश्‍चिमी युरोप, आफ्रिका इत्यादी ठिकाणी इस्लामच्या बंद्यांनी जे अत्याचार केले, ते वाचले किंवा ऐकले, तरी अंगावर काटा उभा रहातो. भारताची तर एक एक इंच भूमी धर्मांध आणि ख्रिस्ती यांनी केलेल्या अत्याचारांची साक्षीदार आहे. दोघांनी मिळून विश्‍वाच्या प्राचीन रिलीजनला नष्ट केले. यहूदी आणि पारसी यांनाही या दोघांनी नष्ट करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.

साम्यवाद हाही एक रिलीजन आहे. साम्यवादानुसार ‘केवळ मार्क्सवादच मनुष्याला सुखी करू शकतो. जो साम्यवादी नाही, तो पापी आहे आणि अशा पाप्यांना ठार करणे’, याला ‘कॉम्रेड’ त्यांचे कर्तव्य समजतात. रशिया, चीन, व्हिएतनाम, उत्तर कोरिया आणि पूर्व युरोपचे देश येथे हेच झाले. केरळमध्ये आजही हेच चालू आहे. यावरून स्पष्ट होते की, रिलीजन हेच आपापसांतील संघर्षाचे मुख्य कारण आहे.

 

८. निसर्गाचा (सृष्टीचा) विनाश !

पाश्‍चात्त्य समाज आणि सृष्टी (मानव, जीव, जगत आणि निसर्ग) यांचाही संघर्ष सातत्याने चालू आहे. कोणताही एखादा समुदाय जेव्हा बलवान होतो, तेव्हा तो संपूर्ण विश्‍वावर स्वतःचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही विश्‍व युद्धे संपूर्ण जगावर त्यांचा दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशानेच झाली. पोर्तुगीज, स्पेनवासी, फ्रान्सवासी आणि इंग्रज यांनी अन्य समुदायांना गुलाम बनवण्याचेच कार्य केले. अधर्मावर चालणारा समाज जेव्हा बलवान होतो, तेव्हा साम्राज्यवादाचा जन्म होतो. हा साम्राज्यवाद शोषण, अत्याचार, अनाचार यांचा आधार घेतो आणि मानवी जगाला पीडाच देतो. आजही तथाकथित महाशक्ती अन्य समाजांवर त्यांचे प्रभुत्व निर्माण करण्यासाठी जीव एकवटून प्रयत्न करत आहेत.

बलवान समाज त्याची शक्ती वाढवण्यासाठी निसर्गाचाही विनाश करत आहे. आज जी पर्यावरणाची गंभीर समस्या आपल्या समोर उभी राहिली आहे, त्याचे कारण व्यक्ती आणि समाज यांच्याकडून निसर्गाचे अतीशोषण होणे, हेच आहे. स्पेन, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशिया इत्यादी देशांनी नैसर्गिक साधनसामुग्रीचा भयंकर दुरुपयोग केला आहे. अमेरिकेची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येचा २५ वा भाग, म्हणजेच ४ टक्के आहे, तरीही या महाशक्तीने विश्‍वाच्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा ४० टक्के भाग गिळंकृत केला आहे. या दुरुपयोगामुळे नैसर्गिक असंतुलन निर्माण झाले आहे. पर्यावरणाचा नाश होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. परिणामी वन्यजिवांची संख्या सातत्याने घटत आहे. आपल्या देशात शहरांंमध्ये चिमण्या, कावळे, पोेपट इत्यादी पक्ष्यांचे दर्शन दुर्लभ होत चालले आहे. यावरून स्पष्ट होते की, पश्‍चिमेचा कोणताही विचार, कोणताही पंथ, कोणतेही दर्शन हे व्यक्ती, समाज, सृष्टी आणि ईश्‍वर यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करू शकले नाही. यातील कोणत्याही दोघांच्या हितांचे रक्षण करणे थांबवू शकले नाही. भारताचे ऋषि, चिंतक, तपस्वी यांनी असे शाश्‍वत सिद्धांत दिले, ज्यामध्ये वरील चारही सत्तांमध्ये सामंजस्य टिकून राहते. एकमेकांना सहकार्य करत समस्त विविधांचे रक्षण करत या सत्ता पूर्ण विकासाच्या दिशेने अग्रेसर होत असत. या शाश्‍वत सिद्धांतानाच धर्माची संज्ञा दिली गेली आणि हाच धर्म संपूर्ण विश्‍वाला भारताची अद्भुत देणगी आहे.’

– कन्हैय्या लाल चतुर्वेदी, बी.टेक एड्., एम्.एस्.सी.(गणित), डी.जे., ज्योतिष विशारद तथा माजी व्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक
(संदर्भ : ‘पाथेय कण’,  १ जून २०१८)

Leave a Comment