ज्योतिषशास्त्र खोटे म्हणणार्‍या बुद्धीवाद्यांना चपराक !

Article also available in :

ज्योतिषशास्त्र विज्ञानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे बुद्धीवाद्यांचे अनुभव

  • अचूक भविष्य सांगणार्‍या वनवासी समाजातील वासुदेवांची अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणार्‍या अंनिसला चपराक !

भविष्य सांगणारे जे वनवासी समाजातील वासुदेव असतात, त्यांना ‘सरोदे जोशी’ म्हणतात. हे आर्थिकदृष्ट्या गरीब, मागास लोक तीर्थक्षेत्री रहातात, गावोगावी फिरतात. एक दिवस एक सरोदे जोशी माझ्या घरासमोरून जात होता. मी त्याला बोलावले, तो काय सांगतो, ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून. तेव्हा त्याने शेजारच्या घरातील महिलेला सांगितले, ‘‘तुमच्या घरात अलीकडेच एक सवाष्ण बाई मेली आहे. त्यामुळे तुमचे घर नीट चालत नाही, घरात अडचणी असतात.’’ ते ऐकून त्या महिलेला धक्का बसला; कारण नुकत्याच तिच्या सासूबाई गेल्या होत्या. सासूबाईंच्या काही इच्छा अपुर्‍या राहिल्या होत्या.  त्या वासुदेवाला त्या महिलेने १०० रुपये काढून दिले. आता काय कारवाई करणार ?

– प्रख्यात ज्योतिषी श्री.श्री. भट, डोंबिवली, ठाणे

.

गुन्हे करण्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना
वेळीच सावध करू शकणारे शास्त्र ! –  माजी पोलीस महासंचालक

‘ज्योतिषशास्त्र मनाचा आणि स्वभावाचाही वेध घेऊ शकते. त्यामुळे कळत-नकळत गुन्ह्याकडे वळण्याची शक्यता असलेल्यांना वेळीच सावध करून, तसेच पूर्वीच गुन्हेगारीकडे वळलेल्यांना चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करून समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हे शास्त्र साहाय्य करू शकते.’

– तुकाराम काशिनाथ चौधरी, तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र. (‘ज्योतिर्विद्यालय’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातील भाषण)

या वेळी पुण्याचे डॉ. डी.डी. पानसे यांचे हस्तसामुद्रिक शास्त्राद्वारे ‘गुन्हेगारांचे विश्‍लेषण’ या विषयावर व्याख्यान झाले होते.’ (२००१)

श्री. बाबा भांड

कृष्णाने (वयाच्या २५ व्या वर्षी योगसामर्थ्याने अग्निसमाधी घेणारे थोर योगी श्री कृष्णा महाराज यांनी) अग्निसमाधी घेणे, ही त्या काळातील अतर्क्य अशी घटना होती. लोक तिला आत्महत्याच मानत होते. माझ्या मनातही शंका होत्या. त्यातच माझ्या एका मित्राने मला सांगितले, ‘‘गावात एक गुरुजी आहेत आणि त्यांच्याकडे संतांच्या कुंडल्या आहेत.’’ मी कृष्णाचा जन्मदिनांक, नाव आणि जन्मस्थळ ही माहिती घेऊन सकाळच्या वेळी संभाजीनगरला सिडकोमध्ये मयुरेगुरुजींकडे गेलो. त्यांच्याकडे बरीच गर्दी होती. माझा क्रमांक आल्यावर मी त्यांना सांगितले, ‘‘हा आमचा मुलगा कामधंदा करत नाही. त्याचे योग सांगा.’’ गुरुजींनी त्रोटक कुंडली मांडली आणि माझ्याकडे आश्‍चर्याने पहात मला म्हणाले, ‘‘हा मुलगा तर जिवंत नाही.’’ मी तात्काळ मयुरेगुरुजींचे पाय धरले. मी त्यांची क्षमा मागितली आणि सांगितले, ‘‘मी तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुमची परीक्षा पाहिली. हा माझा पुतण्या कृष्णा !’’ त्यावर ते त्वरित म्हणाले, ‘‘तुम्ही बाबा भांड का ?’’ मयुरेगुरुजी हसले आणि म्हणाले, ‘‘बरे झाले तुम्ही आलात. बघूया तुमचे आमचे काय जुळते ते !’’ त्यांनी कुंडली मांडली आणि म्हणाले, ‘‘कृष्णाच्या जीवनात गुरूची महादशा आहे.’’ त्याचा दिनांक आणि कालावधीही त्यांनी सांगितला. त्यावर मला आठवले, ‘कृष्णाने साधना चालू केली. तेव्हापासून ते समाधी घेईपर्यंतचा तो कालावधी होता.’ गुरुजींनी दुसरे सूत्र सांगितले, ‘‘याचा जन्म याच्या कामापुरताच आहे.’’ त्याप्रमाणे कृष्णानेही त्याच्या अभंगात स्पष्ट लिहून ठेवले होते, ‘५०१ अभंग लिहिण्यापुरताच माझा जन्म आहे, ते लिहून झाले की मी निघून जाणार.’ शेवटची अगदी धक्कादायक अशी गोष्ट गुरुजींनी सांगितली. ती म्हणजे ‘‘याच्या जीवनात अग्निप्रवेश-योग आहे.’’ हे माझ्यासारख्या बुद्धीवादी माणसासाठी (खरेतर स्वतःला ‘बुद्धीवादी’ म्हणवून घेणेही आज मला चुकीचे वाटते.) मोठे विस्मयकारक आहे.’

– श्री. बाबा भांड (श्री संत कृष्णा महाराज यांचे काका), प्रसिद्ध साहित्यिक आणि प्रकाशक, संभाजीनगर. (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. बाबा भांड यांच्या घेतलेल्या मुलाखतीतील सूत्र (१४.८.२०१४))

‘ज्योतिषशास्त्र मानणारे कर्नाटकमधील जनता दल (निधर्मी)चे तत्कालीन प्रमुख एच्.डी. रेवण्णा विधानसभेच्या निवडणुकीपूूर्वी स्वत:चे घर सोडून भाड्याच्या घरात रहायला गेले होते. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच त्यांना ‘तुम्हाला निश्‍चित जिंकायचे असेल, तर वास्तूशास्त्राप्रमाणे असलेल्या ‘सुदैवी घरा’त रहायला जा’, असा सल्ला एका ज्योतिषाने दिला होता. (संग्राह्य लिखाण २०१४)

भारतियांचे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान अत्यंत प्राचीन आणि मौलिक असल्यानेे त्यांची ग्रहणांविषयी भविष्यवाणी अचूक !

– थोर विचारवंत बर्नियर

भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश पी. सत्शिवम् यांनी त्यांचा १९.७.२०१३ या दिवशी प्रथेप्रमाणे सकाळी ११ वाजता होणारा नियोजित शपथविधी सकाळी ९.३० वाजता करवून घेतला. याविषयी त्यांनी राष्ट्रपतींना विनंती केली होती. ‘सकाळी १०.३० ते दुपारी १२ हा कलावधी ‘राहू’चा आहे’, असे त्यांनी राष्ट्र्रपतींना कळवले होते. (संग्राह्य लिखाण २०.७.२०१३)

 

वैद्यकशास्त्राप्रमाणेच गणित मांडून ज्योतिषशास्त्रही प्रसुतीचा
दिनांक सांगू शकत असल्याचे सत्य बुद्धीवाद्यांना तोंडात बोट घालायला लावणारे !

‘प्रा. श्याम मानव यांनी वर्ष १९८५ मध्ये आव्हान दिले; ते मी स्वीकारले. त्यांना मी सांगितले की, या वर्षी ‘कन्ये’चा गुरु आहे, तेव्हा कन्यासक्षम जी दांपत्य आहेत, त्यांना या वेळेला संतती होईल. हे मी भविष्यच सांगितले. आता ते तपासायचे कसे ? मी म्हटले की, आपण कुठल्याही प्रसुतीगृहात जाऊया आणि तेथे किती बायका कन्या राशीच्या आहेत, ते पाहूया. येताय का आमच्यासमवेत तपासायला. ते त्या वेळी नागपूरला होते. मग मी म्हटले की, आपण नागपूरच्या, नाशिकच्या आणि पुण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊया. तुम्हाला सत्यशोधन करायचे आहे ना ? करूया. आमच्याकडे याच्या नोंदी (रेकॉर्ड) ठेवलेल्या आहेत. अशा आमच्याकडे लाखो पत्रिकांच्या नोंदी आहेत. माझे ‘रेकॉर्ड’ असे आहे की, अमुक याला अमुक दिवशी मुलगी झाली आहे. मी बार्शीमधील संमेलनात जाहीरपणे सांगितले होते की, मी आता तुमच्या सर्वांच्या जन्मतारखा सांगतो आणि तेही ज्योतिषाच्या आधाराने सांगतो. तुम्ही काय करायचे, तर आईच्या गर्भधानाची शेवटच्या मासिक पाळीची तारीख सांगायची आहे. ती जर अश्‍विनी नक्षत्राची असेल, तर तुमचा जन्म अश्‍विनी नक्षत्रावर झाला आहे. तुमचे डॉक्टर याच पद्धतीने तारीख काढतात. मग तुम्ही मला कोणत्या तोंडाने म्हणणार आहात की, तुमचे उत्तर चुकले म्हणून ?

१० नक्षत्रमास झाले की, अश्‍विनी नक्षत्रावर तिची प्रसुती होते. पत्रिका पाहिली तर ती किती मागे-पुढे होते, त्याचे आमचे गणित आहे.’

 – प्रख्यात ज्योतिषी श्री.श्री. भट, डोंबिवली, ठाणे.

 

कुठे पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यात सातत्याने अपयशी ठरलेले
हवामान खाते, तर कुठे वर्षभर आधीच पावसाचा अचूक अंदाज वर्तवणारे दाते पंचांग !

‘आता पावसाचे उदाहरण घ्या. पावसाच्या संदर्भात या वर्षी हवामान खात्याने किती घोळ घातला. आता येईल, नंतर येईल. पाऊस केरळला येऊन पोहोचला. काहीही स्पष्ट नव्हते, तेव्हा दाते पंचांगात स्पष्ट लिहिले होते, १८.६.२०११ ला पाऊस येईल. दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले, हवामान खात्याला चार दिवसांच्या वर भविष्य वर्तवता येत नाही. त्यांच्या तुलनेत आपले पंचांग कुठे आहे ते पहा. दाते पंचांगात दीड वर्षांपूर्वी सांगितले होते की, १८ जूनला पाऊस पडेल. जे लोक उघडपणे मान्य करतात की, आम्हाला पाच-सहा दिवसांच्या वर भविष्य वर्तवता येत नाही. त्या हवामान खात्यावर भविष्य वर्तवण्यासाठी अब्जावधी रुपये शासन खर्च करते. त्या वेळी आमचे म्हणणे असे आहे की, जर ज्योतिषानुसार केवळ २० टक्के योग्य आले, तरी त्याला किती खर्च येतो ? कुठल्याही शासनाने सांगावे की, आम्ही ज्योतिषासाठी इतके पैसे खर्च केले. मग तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे की, तुमचे किती योग्य येते ? दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून तुमची महाविद्यालये चालतात, अब्जावधी रुपयांच्या प्रयोगशाळा आहेत. तेथे सहस्रो लोक काम करतात. तरी त्यांची ५० टक्के कामे चुकतात. परदेशातील लोक म्हणतात की, यांनी काहीच संशोधन केलेले नाही. ५० वर्षे होऊन गेली तरी अजून आमचा नोबेलसाठी विचारही होत नाही. मग या प्रयोगशाळा करतात तरी काय ? काहीही नाही. ज्यांना तुम्ही एक पैसा देत नाही, त्यांना तुम्ही विचारता, तुमचे शास्त्र योग्य नाही ? तुम्हाला हे विचारायचा अधिकार तरी आहे का ? आधी पैसे ठेवा, मग आम्ही जे उत्तर देतो ते योग्य येते कि नाही ते पहा.’

– प्रख्यात ज्योतिषी श्री.श्री. भट, डोंबिवली, ठाणे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment