गुजरातमधील ‘द्वारकाधीश’ मंदिर आणि द्वारकापीठ

Article also available in :

विश्‍वकर्म्याने निर्मिलेले ७ माळ्यांचे ‘द्वारकाधीश’ मंदिर

१. श्रीकृष्णनगरी द्वारका !

१ अ. समुद्रकाठी वसलेली द्वारकानगरी !

श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले.

१ आ. शिल्पशास्त्रकार विश्‍वकर्मा याने निर्मिलेले ‘द्वारकाधीश’ मंदिर !

श्रीकृष्णाचा पणतू वज्रनाभ याने श्रीकृष्णासाठी एक मंदिर बांधण्याचे ठरवले. त्याने त्यासाठी शिल्पशास्त्रकार विश्‍वकर्मा याला आवाहन केले. विश्‍वकर्मा याने या मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर ७ माळ्यांचे आहे. त्यावरील सर्व शिल्पकाम दैवी आहे. ‘विश्‍वकर्मा याने स्वर्गलोकात या मंदिराची निर्मिती करून मंदिराला एखाद्या उल्कापाताप्रमाणे एका रात्रीत द्वारकेत आणले’, असे सांगितले जाते.

द्वारकाधीश मंदिरातील ‘द्वारकाधीश’ नावाने जगविख्यात असलेली श्रीकृष्णमूर्ती

१ इ. मंदिरावर असलेला धर्मध्वज आणि मंदिराचे ‘मोक्षद्वार’ अन् ‘स्वर्गद्वार’ !

श्रीकृष्णाने द्वारकानगरी वसवली; म्हणून येथील मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीला ‘द्वारकाधीश’ या नावाने संबोधतात. मंदिराच्या मुख्य कळसावर एक मोठा धर्मध्वज आहे. हा धर्मध्वज दिवसातून ५ वेळा पालटण्यात येतो. मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या द्वाराला ‘मोक्षद्वार’ असे म्हणतात आणि दक्षिण द्वाराला ‘स्वर्गद्वार’ असे म्हणतात.

 

२. द्वारकापीठ येथील चंद्रमौलीश्‍वर शिवलिंग

या मंदिराला लागूनच आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले द्वारकापीठ आहे. या ठिकाणी शंकराचार्यांच्या मठात आद्य शंकराचार्यांनी दिलेल्या नीलमण्यातील चंद्रमौलीश्‍वर शिवलिंग आहे.

– श्री. विनायक शानभाग, देहली (६.४.२०१९)

1 thought on “गुजरातमधील ‘द्वारकाधीश’ मंदिर आणि द्वारकापीठ”

Leave a Comment