ज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्‍या सेवकाच्या कुंडलीतील योग

Article also available in :

सौ. प्राजक्ता जोशी

‘लवकर बरे वाटावे; म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार रुग्णाने धन्वंतरी देवतेला प्रार्थना करून औषध घ्यावे. औषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी देवतेचा प्रसाद समजून औषध ग्रहण करावे. औषध ग्रहण करतांना देवावर पूर्ण श्रद्धा असावी. रुग्णाईत व्यक्ती ज्यांच्या माध्यमातून उपचार करून घेते, त्या व्यक्तीचे, उदा. वैद्य, परिचारिका, सहवासातील व्यक्ती इत्यादींचे ग्रहमान पूरक असल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. रुग्णाची एखाद्या वैद्यांवर श्रद्धा असली, तरीही काही वेळा त्याच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नाही; कारण त्यांचे ग्रहमान जुळत नसते. याउलट एखाद्या रुग्णाला त्वरित आराम पडतो. यासाठी ‘रुग्णाने औषध सेवन करतांना कोणती काळजी घ्यावी आणि त्याच्या सेवेत असणार्‍या व्यक्तीचे ग्रहमान कसे असावे ?’, याविषयी थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.

 

१. औषध सेवन करण्यासाठी मुहूर्त

१ अ. औषध सेवनाच्या आरंभी कोणती नक्षत्रे असावीत ?

औषध सेवन करतांना आणि श्री गुरूंची सेवा करण्यासाठी सेवेच्या आरंभी अश्‍विनी, मृग, पुष्य, हस्त, चित्रा, अनुराधा आणि रेवती ही नक्षत्रे असावीत. औषध सेवनास जन्मनक्षत्र सर्वथा वर्ज्य करावे.

१ आ. सेवेच्या आरंभी कोणते वार असावेत ?

सेवेचा आरंभ करतांना किंवा औषध देतांना रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असावा. यांपैकी रविवार अतिशय शुभ मानला जातो; कारण रवि हा ग्रह तेजतत्त्वाचा कारक आहे. कोणतेही औषध रविवारी घेण्यास आरंभ केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

१ इ. औषध घेण्याच्या आरंभी कोणती तिथी असावी ?

औषध घेतांना शुभ तिथी असावी. क्षयतिथी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी नसाव्यात.

 

२. रुग्णाईत व्यक्ती आणि सेवक यांच्या कुंडलीत काय असावे आणि काय नसावे ?

२ अ. सेवकाच्या कुंडलीत अशुभ ग्रह नसावेत !

सेवकाच्या कुंडलीत रवि, चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे ग्रह शुभ असावेत. सेवकाच्या कुंडलीत ग्रह अशुभ किंवा नीच राशीत असल्यास रुग्णाचा त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते किंवा रुग्णाला विलंबाने आराम मिळतो; कारण सेवकाच्या कुंडलीतील ग्रह अशुभ असल्यास त्याचा रुग्णावर विपरीत परिणाम होतांना दिसतो. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सेवेत असणार्‍या साधकांच्या कुंडल्या पाहून सेवा दिल्यास त्यांच्या उपचारांना अनुकूलता प्राप्त होईल.)

२ आ. ग्रह, ग्रहाची नीच रास आणि राशीचा अनुक्रमांक

२ इ. रुग्णाईत व्यक्ती आणि सेवक यांच्यात ग्रहमैत्री असावी !

ग्रहमैत्री म्हणजे दोन व्यक्तींच्या राशींचे स्वामी हे मित्र ग्रह असावेत, उदा. रुग्णाईत व्यक्तीची रास मकर असल्यास तिचा राशी स्वामी शनि ग्रह आहे. शनि ग्रहाचे मित्र ग्रह बुध आणि शुक्र हे आहेत. याचा अर्थ मकर राशीच्या व्यक्तींची बुध ग्रहाशी संबंधित असणार्‍या (मिथुन आणि कन्या) राशी आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असणार्‍या (वृषभ आणि तूळ) राशींच्या व्यक्तींशी ग्रह मैत्री आहे; म्हणून ‘या राशीच्या व्यक्तींची सेवा अधिक फलदायी होते’, असे अनुभव आहेत. पुढील सारणीत ग्रह, ग्रहानुसार त्यांच्या राशी आणि ग्रहानुसार मित्र ग्रह दिले आहेत.

२ ई. रुग्णाईत व्यक्तीच्या नक्षत्रापासून सेवकाचे नक्षत्र द्वितीय नसावे !

ज्यांची सेवा करायची, त्यांच्या नक्षत्रापासून सेवकाचे नक्षत्र दुसरे असेल, तर सेवा व्यर्थ ठरते. (परात्पर गुरु डॉक्टरांचे नक्षत्र ‘उत्तराषाढा’ असल्याने त्यांच्या नक्षत्रापासून दुसरे नक्षत्र म्हणजे ‘श्रवण’ नक्षत्र असणार्‍या साधकांनी त्यांची सेवा करू नये.)’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक गोष्टीचाच किती खोलवर विचार केला आहे, हे कळले की, थक्क व्हायला होते. ‘मला सर्व कळते’, असा अहं असलेल्या आणि काही शिकण्याची इच्छा नसलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ज्योतिषशास्त्र थोतांड वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले.

Leave a Comment