१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !

तंजावर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती जी.के. सीतारामन्गुरुजी यांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांपैकी ४ दिव्य अंश सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी केले अर्पण ! सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आगमन !

नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

श्रीमती दिनप्रभा सामंतआजी सनातन संस्थेच्या १३७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा देवद येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सूत्रे आचरणात आणा आणि ‘संत’ व्हा !

सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान !

व्यष्टी आणि समष्टी साधना परिपूर्ण करणार्‍या, तसेच सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.) शशिकला किणी (वय ७७ वर्षे) !

अक्कांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. दिवसभरातील प्रत्येक कृती झाल्यावर त्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यातून ‘मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या सांगतात. ‘गुरुदेवांनी माझा हात पकडून मला येथपर्यंत आणले’, या विचाराने प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्‍या सनातनच्या १३० व्या संत उजिरे, कर्नाटक येथील पू. (श्रीमती) कमलम्मा (वय ८१ वर्षे) !

कमलम्मा यांच्या मनात ‘साधनेमुळे स्वतःला जसा लाभ झाला आहे, तसा लाभ सर्वांना व्हायला पाहिजे’, अशी तळमळ आहे. त्यामुळे भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या साधना करायला सांगतात. आतापर्यंत त्यांनी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे आणि प्रसारसेवा करणे’, अशा सेवा केल्या आहेत.

सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत पू. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) !

पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.

कर्नाटकातील श्री. सांतप्‍पा गौडा (वय ८१ वर्षे), श्रीमती कमलम्‍मा (वय ८१ वर्षे) आणि सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘कर्नाटकच्‍या साधकांचे अहोभाग्‍य आहे की, एकाच दिवशी ईश्‍वराने ३ संतरत्नांच्‍या रूपात त्‍यांना अनमोल भेट दिली आहे. ‘दक्षिण कन्‍नड’ या जिल्‍ह्यातील ३ साधकांनी एकाच दिवशी संतपद प्राप्‍त करणे’, ही सनातनच्‍या इतिहासातील एक अपूर्व घटना आहे.

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संत अनगोळ (बेळगाव) येथील पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि तंतोतंत आज्ञापालन करणार्‍या अन् वर्षाला ५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके !

३.१२.२००२ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी प.पू. फडकेआजींच्या निवासस्थानी येऊन त्यांना ‘सनातनच्या पहिल्या संत’ घोषित केले. २०.५.२००३ या दिवशी प.पू. फडकेआजींचा ७५ वा वाढदिवस देवद आश्रमातील साधकांनी भावपूर्णरित्या साजरा केला.