८.११.२०२२ या दिवशी भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित), ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फल !

कार्तिक पौर्णिमा (८.११.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. त्यामुळे भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशात खग्रास अवस्था दिसू शकेल; मात्र महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

धर्मानुसार आचरण केल्याने आरोग्याचेही रक्षण होत असल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार विनाअन्न उपवास करा !

८.११.२०२२ या दिवशी चंद्रग्रहण आहे. वेधकाळात अन्नग्रहण करणे निषिद्ध आहे. ऋषिमुनींनी ग्रहणासंबंधी एवढे कडक नियम का बरे घालून ठेवले आहेत ?, असे प्रश्न पडू शकतात. पुढे दिलेले उपवासाचे लाभ समजून घेऊन एकदा स्वतः उपवास करून ते अनुभवल्यावर मात्र आपल्याला ऋषिमुनींप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल. २४ घंटे उपवास केल्याने पुढील लाभ होतात.