पुष्पौषधी

Article also available in :

पुष्पौषधी

 

१. प्रस्तावना

‘पुष्पौषधी’ या औषधोपचार पद्धतीचा शोध डॉ. एडवर्ड बाश, (एम्.बी.बी.एस्.), लंडन यांनी लावला. ‘साधी आणि सोपी उपायपद्धत (औषधोपचार पद्धत) असावी’, या हेतूने त्यांनी आपला चांगला चाललेला व्यवसाय बंद केला आणि पुढील शोधासाठी ते जंगलामध्ये गेले. हळूहळू फुलांचे औषधी उपयोग त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जवळ ४० वर्षे या पद्धतीचा अभ्यास केला आणि ३९ प्रकारची औषधे सिद्ध केली. या पॅथीचा अभ्यास करत असतांना त्यांनी निसर्गाची पुढील तत्त्वे विचारात घेतली.

अ. निसर्ग नेहमी पूर्णत्वाच्या दिशेने काम करतो.

आ. निसर्ग पुष्कळ प्रमाणात निर्मिती करतो.

इ. निसर्गाचे मार्ग पुष्कळ सोपे असतात.

ई. नैसर्गिक मार्ग हे नित्यस्वरूपी असतात.

हे जर सत्य असेल, तर निश्‍चितच ‘निसर्गाने कोणतेही दुष्परिणाम न करणारी आणि स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील, अशी उपचारपद्धत उपलब्ध करून ठेवलेली असावी’, असा विचार झाला. ही उपचारपद्धत म्हणजे ‘पुष्पौषधी’ होय. यामध्ये ३९ औषधे असून ती अरण्यामध्ये उगवणार्‍या फुलांपासून सिद्ध केलेली आहेत. ही सर्व औषधे नैसर्गिक स्वरूपामध्ये असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या पद्धतीमुळे व्यक्तीमत्त्वामध्ये पालट घडून येतात. या पद्धतीमध्ये व्यक्तीमत्त्वानुसार औषध दिले जाते.

 

२. पुष्पौषधींची वैशिष्ट्ये

२ अ. स्वरूप

१. यामध्ये केवळ ३९ औषधे आहेत.

२. सर्व औषधे समजण्यास सोपी आहेत.

३. ही औषधे गोड गोळ्यांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत.

२ आ. औषधे घेण्याची पद्धत

आधुनिक वैद्य प्रवीण मेहता

१. या औषधांना खाण्या-पिण्याची कोणतीही बंधने नाहीत.

२. या औषधांना (Contra-indications) नाहीत, म्हणजे ‘ही औषधे कुणाला देऊ नयेत’, असे कुठेही सूचित केलेले नाही. सर्वांनाच ती लागू आहेत.

३. ही औषधे कोणत्याही वेळी घेतली, तरी चालतात. ‘ती खाण्यापूर्वी किंवा खाण्यानंतर घ्यावीत’, असे कोणतेही बंधन नाही. ती चहा, कॉफी, पिण्याचे पाणी यांमध्ये मिसळून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांची चव पालटत नाही.

४. ही औषधे केवळ चघळून खायची असतात.

५. ही ५ प्रकारची औषधे एकावेळी एकत्रितपणेही घेऊ शकतो.

६. ही औषधे व्याधीच्या (आजाराच्या) स्वरूपाप्रमाणे दिवसातून अनेक वेळा घेता येतात. दीर्घ आजारांमध्ये दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावीत.

७. ही औषधे नवजात शिशूपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही, तसेच गर्भवती महिलाही घेऊ शकतात.

२ इ. औषधे टिकण्याचा कालावधी

१. ही औषधे मुदतबाह्य होत नाहीत. ती कितीही वर्षे टिकू शकतात.

२. ही औषधे सुरक्षित असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

२ ई. औषधांचा परिणाम

या औषधांचा परिणाम त्वरित दिसून येतो.

 

३. प्रथमोपचार आणि पुष्पौषधी

रेस्क्यू रेमिडी (Rescue Remedy)

‘गंभीर स्वरूपाचे अपघात, भाजणे, जळणे, ‘इलेक्ट्रिक शॉक’, तसेच विषप्रयोग इत्यादी कारणांमुळे जिवाला धोका निर्माण होऊन वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असेल, त्या वेळी या सर्व प्रकारांच्या आजारांवर हे औषध उपयुक्त आहे.

१. कितीही खोलवर जखम असेल आणि त्यामधून रक्तस्राव होत असेल, तर या औषधाने रक्तस्राव लगेचच नियंत्रणामध्ये येतो आणि जखमेवर ‘बँडेज’ करण्याची आवश्यकता भासत नाही.

२. रुग्ण बेशुद्ध होऊन हातपाय थंड पडले असतील, श्‍वासोछ्वास मंद झाला असेल आणि रुग्णाची नाडी लागत नसेल, तर हे औषध दिले असता काही मिनिटांतच ‘काहीच घडले नाही’, अशा पद्धतीने रुग्ण उठून चालू लागतो.

३. विषप्रयोग झाला असतांना किंवा विषारी प्राण्यांनी दंश केला असता हे औषध दिल्यास काही वेळातच विषाचा परिणाम नष्ट होण्यास साहाय्य होते.

४. भाजणे, पोळणे यांवर हे औषध दिले असता वेदना त्वरित अल्प होतात आणि भाजण्याचे गंभीर परिणामही होत नाहीत.

५. कोणत्याही प्रकारच्या असह्य वेदना त्वरित अल्प होतात.

कितीही गंभीर स्थिती असली, तरी या औषधाची केवळ एक मात्राच पुरेशी होते. दुसरी मात्रा देण्याची आवश्यकताच भासत नाही. हे केवळ प्रथमोपचार म्हणून उपयुक्त नसून या औषधामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होतो. शस्त्रक्रिया करण्याच्या काही वेळ आधी या औषधाची एक मात्रा दिली असता शस्त्रक्रियेनंतर अतिशय अल्प प्रमाणात रक्तस्राव होतो आणि जखम लवकर भरून रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हे औषध आपल्या प्रथमोपचार पेटीमध्ये ठेवणे आवश्यक आहे.’

– संकलक : होमिओपॅथिक वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(११.८.२०२०)

या पुष्पौषधीच्या संदर्भात वाचकांना काही शंका विचारायच्या असल्यास अथवा त्या संदर्भात अधिक जाणून घ्यायचे असल्यास त्यांनी त्या संदर्भातील माहिती पुढील संगणकीय अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपाल पत्ता : डॉ. प्रवीण मेहता, द्वारा सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद,

पोस्ट : ओ.एन्.जी.सी., तालुका – पनवेल, जिल्हा – रायगड. ४१० २२१

Leave a Comment