उज्जैन – उज्जैन सिंहस्थपर्वात लावण्यात आलेले सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला १९ मे या दिवशी ग्रामस्थांनी भेट दिली. त्यांच्यापैकी एका युवकाने भगवान शिवाचे चित्र असलेला टी-शर्ट घातला होता. यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी सदर युवकाचे प्रबोधन केले. श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला. यानंतर दोघाही ग्रामस्थांना झालेला पश्चाताप त्यांच्या चेहर्यावर दिसून आला. याविषयी त्यांनी नम्रपणे क्षमायाचना करून प्रदर्शनात एका कोपर्यात जाऊन त्यांच्या पिशवीतून दुसरा शर्ट काढून तो घातला.
महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा महाकुंभ...
महाकुंभ मेळ्यात सनातन संस्थेच्या ‘फिरत्या वितरण कक्षां’द्वारे भाविकांमध्ये धर्मप्रचार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र...
हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु संस्कृती अन् धमार्र्चरण यांची आवश्यकता समाजाला पटवून देत...