सिंहस्थ क्षेत्री सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणार्‍या साधूसंतांनी काढलेले गौरवोद्गार !

सिंहस्थ क्षेत्री सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणार्‍या साधूसंतांनी
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची
ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

पू. (कु.) स्वाती खाडये

  उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते २३ एप्रिल या दिवशी करण्यात आले. त्यानंतर देशभरातील अनेक साधूसंत, महंत, महामंडलेश्‍वर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी, मान्यवर आदी प्रतिदिन या प्रदर्शनास भेट देत आहेत. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.

साधूसंतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वेशभूषा साधी आहे; मात्र आत्मा प्रकाशमान आहे. – प्रदर्शन पहायला आलेले एक संत  (प्रदर्शनस्थळी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यानंतर त्यांनी हे गौरवोद्गार काढले.) 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तेजामुळे सनातनचे साधक गुणी, शांत आणि नम्र आहेत. – ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा, अध्यक्ष, जय माता दरबार, बरेली, उत्तरप्रदेश

सनातन संस्था आणि तिचे कार्य यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती साधूसंताचे कार्य करत आहे ! – अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज, उज्जैन, मध्यप्रदेश

२. सनातनचे कार्य बघून मी धन्य झालो ! – आचार्य राघवकीर्ती, प्रमुख, श्रीमहागणती आध्यात्मिक मिशन, उज्जैन, मध्यप्रदेश

३. सनातनच्या कार्यामुळे समाजात परिवर्तन होईल ! – श्री महंत स्वामी मनोहरपुरीजी महाराज, राष्ट्रीय संरक्षक, हिंदु धर्मगुरु दशनाम गोस्वामी अखाडा, इंदूर, मध्यप्रदेश

४. सनातन संस्थेचे कार्य धर्मानुरूप आहे ! – पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, अखिल भारतवर्षीय धर्मसंघ तथा स्वामी करपात्री फाऊंडेशन, राजस्थान

५. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक सर्व सूत्रांवर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे ! – श्री महंत स्वामी मनोहरपुरीजी महाराज, राष्ट्रीय संरक्षक, हिंदु धर्मगुरु दशनाम गोस्वामी अखाडा, इंदूर, मध्यप्रदेश

६. देवाच्या कृपेमुळे मला सनातनचे संत आणि साधक यांना भेटायची संधी मिळाली ! – प.पू. स्वामी श्री अवधूतानंद जी महाराज परमहंस, होशियारपुर, पंजाब

७. सनातनवर बंदी आणणयाचे प्रयत्न करणे, हाच सर्वांत मोठा मूर्खपणा आहे ! – पू. स्वपन महाराज, रामकृष्ण मिशन, बेलपहाडी, कोलकाता

८. सनातनचे आणि माझे कार्य एकच आहे ! – पू. जगदीश जोशी, संस्थापक, द्वारका आश्रम, उज्जैन

९. सनातनला मी यथाशक्ती साहाय्य करण्यास सिद्ध आहे ! – सनातन संसदचे श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर प्रेमानंदपूरी महाराज, उज्जैन, मध्यप्रदेश

१०. आद्य शंकराचार्यांनी केलेल्या धर्मजागृतीच्या कार्याप्रमाणे सनातनच्या कार्यास प्रतिसाद लाभो ! – महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज, श्री काशी अन्नपूर्णा अन्नक्षेत्र ट्रस्ट, वाराणसी

११. संस्था संख्यात्मकदृष्ट्या छोटी असू शकते; पण विचार आणि कृती यांनी ती मोठी आहे ! – श्री. सोनू गेहलोत, सभापती, उज्जैन महानगरपालिका

सनातनच्या अमूल्य ग्रंथसंपदेविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. सनातन संस्था चिंधी बांधून सोने विकत आहे, (सनातनच्या ग्रंथांत अमूल्य ज्ञान असून बढेजाव किंवा देखावा नाही.) तर काही तथाकथित संत सोने बांधून चिंधी विकत आहेत ! (ते जे समाजाला देत आहेत, त्याचे काही मूल्य नाही) – श्री. वेदांत गराडे, खरगोन, मध्यप्रदेश

२. अनेक ठिकाणी शास्त्र सांगताना संतांनाही अडचण येते; पण सनातन मात्र खरे सत्य मांडण्याचे कार्य करत आहे ! – स्वामी चिदंबरानंदजी महाराज, विद् साधना साध्यम ट्रस्ट, ठाणे, महाराष्ट्र

३. सनातनची ग्रंथसंपदा अत्यंत उत्कृष्ट आहे ! – आचार्य राघवकीर्ति, प्रमुख, श्रीमहागणति आध्यात्मिक मिशन, उज्जैन, मध्यप्रदेश

४. जो खरा ज्ञानी आहे तोच खर्‍या अर्थाने सनातनच्या ग्रंथांचे वाचन करू शकतो ! – आचार्य राघवकीर्ति, प्रमुख, श्रीमहागणति आध्यात्मिक मिशन, उज्जैन, मध्यप्रदेश

५. पुष्कळ विषयांवर ग्रंथ लेखन केले आहे. कुणीतरी (म्हणजे परात्पर गुरु डॉ.आठवले) सत्ययुग आणणार आहे, या संकल्पानेच हे ग्रंथ लिहिले आहेत ! – महामंडलेश्‍वर स्वामी विवेकानंदगिरीजी महाराज, अध्यक्ष, लोकतारण संस्थान, उत्तराखंड

६. सनातनचे ग्रंथ अप्रतिम आहेत ! – डॉ. रघुनाथजी अवधूत प्राणविद्याचार्य, वाराणसी.

७. हिंदु धर्माप्रमाणे करायचे योग्य आचरणाचे शास्त्र सनातनच्या ग्रंथांत दिले आहे ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्वामी शिवचैतन्यपुरीजी महाराज, वरिष्ठ आचार्य, श्रीशंकर पिठाधीश्‍वर पंचायाती अखाडा महानिर्वाणी, वृंदावन

हिंदु जनजागृती समिती आणि तिचे कार्य यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. हिंदूंना संघटित करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या प्रयत्नांना आमचे समर्थन आहे ! – प.पू. स्वामी श्री अवधूतानंदजी महाराज परमहंस, होशियारपूर, पंजाब

२. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या कार्याने समाजात निश्‍चित परिवर्तन होईल ! – महांमडलेश्‍वर रामकृष्णाचार्यजी महाराज, भागवत धर्म प्रचारक, उज्जैन, मध्यप्रदेश

३. राष्ट्र आणि हिंदुत्व यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेला त्याग अनुकरणीय आहे ! – श्री. अरविंद जैन, सचिव, हिन्दू शौर्य जागरण मंच, उज्जैन

– (पू.) कु. स्वाती खाडये, उज्जैन

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात