हिंदूंची मंदिरे चैतन्यस्रोत आहेत, याचे संशोधन विज्ञानवादी नासाला करावेसे वाटते; मात्र तेच अंनिससारख्या तथाकथित विज्ञानवाद्यांना करावेसे वाटत नाही!
अल्मोडा (उत्तराखंड) – जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत. पर्यावरणतज्ञ डॉ. अजय रावत यांनी या मंदिराच्या स्थानाचे अनेक वर्षे संशोधन केले आहे. येथील क्षेत्राच्या भूमीखाली विशाल भू-चुंबकीय दगडी स्तर आहे. यावर विद्युत कणांचे आवरण आहे. ते संपूर्णपणे भारित आहे. त्याद्वारे चुंबकीय लहरी प्रक्षेपित होत आहेत.
गेल्या २ वर्षांपासून अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे शास्त्रज्ञ या क्षेत्राचे संशोधन करत आहेत. या चुंबकीय दगडी स्तराच्या चुंबकीय लहरींचा मनुष्याच्या मेंदूवर काय परिणाम होतो, याचा हे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.
आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून कसारदेवी मंदिर आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील माचू-पिच्चू, तसेच इंग्लंडच्या स्टोन हेंग येथील स्थानांमध्ये समानता आहे. या तीनही ठिकाणी चुंबकीय शक्ती आहे. डॉ. रावत यांच्या संशोधनात ही चारही ठिकाणे चुंबकीयदृष्ट्या भारित असल्याचे लक्षात आले आहे.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास
कुलु खोर्यामध्ये अधिष्ठात्री देवता ‘बिजली महादेव’ आणि ‘बेखलीमाता’ (भुवनेश्वरीदेवी) यांचे आहे चैतन्यमय स्थान !
चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या...
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला...
कर्नाटक राज्यातील शृंगेरी (जिल्हा चिक्कमगळुरू) आणि कोल्लुरू (जिल्हा उडुपी) येथील मंदिर
धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !