सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव
सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि गुरुदेवांचा ८३ वा जन्मोत्सव

महोत्सवाविषयी
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या पावन प्रसंगी, गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव या भव्य तीन दिवसीय आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये भारतभरातून तसेच विदेशांतून प. पू. संत, आध्यात्मिक मार्गदर्शक, राष्ट्रभक्त राजकीय मान्यवर, तसेच धर्मप्रेमी साधक एकत्र येणार आहेत.
हा महोत्सव म्हणजे ‘सनातन राष्ट्र (रामराज्य)’ पुनर्स्थापनेसाठीच्या कार्याची मंगलप्रारंभिका आहे. या निमित्ताने भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरु’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करील.
हा महोत्सव म्हणजे ‘सनातन राष्ट्र (रामराज्य)’ पुनर्स्थापनेसाठीच्या कार्याची मंगलप्रारंभिका आहे. या निमित्ताने भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरु’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करील.
महोत्सव अनुभव

रौप्य महोत्सव
सनातन संस्थेच्या २५ वर्षांच्या धर्मकार्यासाठी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या विविध उपक्रमांत सहभागी व्हा.

८३ वा जन्मोत्सव
गुरुदेवांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी, नाडीपठण आणि जन्मोत्सव समारंभ

शंखनाद महोत्सव
रामराज्य संकल्प जपयज्ञ, महाधन्वंतरी यज्ञ, संत सभा, धर्मप्रेमी कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव









