साधकांनो, जे घडते, ते भल्यासाठीच, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने कोरोना सारख्या भयावह संकटाचा सामना करा !
सध्या कोरोनासारख्या भयावह संकटाने सार्या विश्वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक राष्ट्रांतील जीवनावश्यक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या विषाणूमुळे मानवाची सर्व स्तरांवर अपरिमित हानी झाली आहे.
