रामरक्षा

Article also available in :

रामरक्षा लयीत म्हणणे

‘रामरक्षा’ बुधकौशिक ऋषींनी लिहिलेले आहे. खरेतर ‘रामरक्षा’ हा एक मंत्रच आहे. रामरक्षेच्या सुरुवातीला ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ सांगितलेले आहे. ‘मंत्र’ म्हणजे एक ध्वनी, एक अक्षर, एक शब्द किंवा शब्दांचा समूह. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादा मंत्र जपला जातो, त्या वेळी त्या जपातून एक विशिष्ट शक्‍ती निर्माण होते. याकरता रामरक्षा एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे.

 

श्रीराम Shriram
श्रीराम

स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्‍ती निर्माण होते. याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे. तसेच या स्तोत्रातील श्रीरामाच्या गुणांच्या वर्णनामुळे ते गुण आपल्यात येतात.

ऐकूया तर रामरक्षा सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझे गुरुजी यांच्या आवाजात..

 

रामरक्षा

श्रीगणेशाय नमः । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य ।
बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छन्दः । सीता शक्‍तिः ।
श्रीमत् हनुमान् कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।।

।। अथ ध्यानम् ।।

ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीता, मुखकमलमिलल्, लोचनन् नीरदाभम् नानाऽलङ्कारदीप्तन्, दधतमुरुजटा, मण्डलम् रामचन्द्रम् ।।

।। इति ध्यानम् ।।

चरितम् रघुनाथस्य, शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरम् पुंसाम्, महापातकनाशनम् ।।१।।

ध्यात्वा नीलोत्पलश्यामम्, रामम् राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतञ्, जटामुकुटमण्डितम् ।।२।।

सासितूणधनुर्बाण, पाणिन् नक्‍तञ्चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुम्, आविर्भूतमजं विभुम् ।।३।।

रामरक्षाम् पठेत्प्राज्ञः, पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु, भालन् दशरथात्मजः ।।४।।

कौसल्येयो दृशौ पातु, विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणम् पातु मखत्राता, मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।।

जिह्वां विद्यानिधिः पातु, कण्ठम् भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुध पातु, भुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।।

करौ सीतापतिः पातु, हृदयञ् जामदग्न्यजित् ।
मध्यम् पातु खरध्वंसी, नाभिञ् जाम्बवदाश्रयः ।।७।।

सुग्रीवेशः कटी पातु, सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु, रक्षःकुलविनाशकृत् ।।८।।

जानुनी सेतुकृत् पातु, जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः, पातु रामोऽखिलं वपुः ।।९।।

एताम् रामबलोपेताम्, रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री, विजयी विनयी भवेत् ।।१०।।

पातालभूतलव्योम, चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्‍तास्ते, रक्षितम् रामनामभिः ।।११।।

रामेति रामभद्रेति, रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्, भुक्तिम् मुक्तिञ् च विन्दति ।।१२।।

जगज्जैत्रेकमन्त्रेण, रामनाम्नाऽभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य, करस्थाः सर्वसिद्धयः ।।१३।।

वज्रपञ्जरनामेदं, यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र, लभते जयमङ्गलम् ।।१४।।

आदिष्टवान् यथा स्वप्ने, रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः, प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।।

आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानाम्, रामः श्रीमान् स नः प्रभुः ।।१६।।

तरुणौ रूपसम्पन्नौ, सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ, चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।१७।।

फलमूलाशिनौ दान्तौ, तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ, भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।१८।।

शरण्यौ सर्वसत्त्वानां, श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ, त्रायेतान् नौ रघूत्तमौ ।।१९।।

आत्तसज्जधनुषा, विषुस्पृशा-वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः, पथि सदैव गच्छताम् ।।२०।।

सन्नद्धः कवची खड्गी, चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोऽस्माकम्, रामः पातु सलक्ष्मणः ।।२१।।

रामो दाशरथिः शूरो, लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः, कौसल्येयो रघूत्तमः ।।२२।।

वेदान्तवेद्यो यज्ञेशः, पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमान्, अप्रमेयपराक्रमः ।।२३।।

इत्येतानि जपन्नित्यम्, मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकम् पुण्यं, सम्प्राप्नोति न संशयः ।।२४।।

रामन् दूर्वादलश्यामम्, पद्माक्षम् पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्, न ते संसारिणो नरः ।।२५।।

रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरम्, सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थङ् करुणार्णवङ् गुणनिधिं, विप्रप्रियन् धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धन्, दशरथतनयं, श्यामलं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामम्, रघुकुलतिलकम्, राघवम् रावणारिम् ।।२६।।

रामाय रामभद्राय, रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय, सीतायाः पतये नमः ।।२७।।

श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणम् भव राम राम ।।२८।।

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणम् प्रपद्ये ।।२९।।

माता रामो, मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वम् मे, रामचन्द्रो दयालुर्, नान्यञ् जाने, नैव जाने न जाने ।।३०।।

दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम् ।।३१।।

लोकाभिरामम् रणरङ्गधीरम्, राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपङ् करुणाकरन् तम्, श्रीरामचन्द्रं शरणम् प्रपद्ये ।।३२।।

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।।३३।।

कूजन्तम् रामरामेति, मधुरम् मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां, वन्दे वाल्मीकिकोकिलम् ।।३४।।

आपदामपहर्तारन्, दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामम्, भूयो भूयो नमाम्यहम् ।।३५।।

भर्जनम् भवबीजानाम्, अर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानाम्, रामरामेति गर्जनम् ।।३६।।

रामो राजमणिः सदा विजयते, रामम् रमेशम् भजे रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणम् परतरम्, रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर ।।३७।।

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यम्, रामनाम वरानने ।।३८।।

।। इति श्रीबुधकौशिकविरचितं, श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ।।
।। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ।।

हे ऐकून स्तोत्र पठण करणार्‍यांना जास्तीतजासत आध्यात्मिक लाभ होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

 

रामरक्षा भावपूर्ण म्हटल्याने होणारे लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’

 

सार्थ श्रीरामरक्षास्तोत्राच्या
आरंभी असलेल्या श्‍लोकांमधील गुह्यार्थ !

PP_pande_maharaj_125१. गुह्यार्थ लक्षात घेऊन
श्रीरामरक्षास्तोत्र 
म्हटल्यास अधिक लाभ होणे

सार्थ श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असतांना आरंभीच्या ओळींमध्ये मंत्राविषयीचा इतिहास दिसून येतो. तसेच त्या मंत्रांमध्ये काय शक्ती आहे ?, ते स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर त्याचा परिणामही दिसून येतो. आरंभीच्या ओळींमधील गुह्यार्थ लक्षात घेऊन श्रीरामरक्षास्तोत्र म्हटल्यास त्याची परिणामकारकता अधिक जाणवून त्याचा लाभ होतो.

२. श्रीरामरक्षास्तोत्राचा आरंभ श्री गणेशवंदनेने करण्याचे कारण

श्री गणेशाय नमः । असे म्हणून श्री गणेशाला वंदन करून आरंभ केला आहे; कारण श्री गणेश विघ्नहर्ता आहे. वर्णाचा आरंभ त्याच्यापासूनच झाला असल्यामुळे पुढे वेदादी शब्दांचे भांडार बनले आहे; म्हणून प्रथम कोणत्याही कार्याचा आरंभ त्याच्या वंदनाने करतात. त्यामुळे कार्य सफल होते.

३. श्रीरामरक्षास्तोत्र मंत्रस्वरूप असण्यामागील इतिहास

अ. अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । म्हणजे हे श्रीरामरक्षास्तोत्र मंत्रस्वरूप आहे.

आ. बुधकौशिकऋषिः । म्हणजे हे स्तोत्र बुधकौशिकऋषींनी लिहिले आहे. बुधकौशिकऋषि हे मंत्रद्रष्टे होते. त्यांच्यावर श्रीरामचंद्राची कृपा होऊन त्यांना हे स्तोत्र स्फुरले. त्यामुळे यातील प्रत्येक शब्द हा मंत्रस्वरूप झाला आहे.

४. स्तोत्राची देवता, छंद, शक्ति, कीलक आणि पठणाचा उद्देश

अ.श्रीसीतारामचन्द्रो देवता । म्हणजे श्रीसीतेसह श्रीरामचंद्र हे या मंत्रातील देवता आहेत.

आ. अनुष्टुप् छन्दः । म्हणजे या मंत्राची रचना अनुष्टुप छंदात म्हणजेच अनुष्टुप वृत्तात केली आहे.

इ. सीता शक्तिः । म्हणजे श्रीसीता ही या मंत्राची शक्ती आहे.

ई. श्रीमद्हनुमान् कीलकम् । म्हणजे श्रीहनुमान या स्तोत्राचा शक्तीरक्षक आहे.

उ. श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः । म्हणजे श्रीरामरक्षास्तोत्र मंत्रजपाचा उपयोग हा श्रीरामचंद्राची उपासना करण्यासाठी आहे.

५. गुह्य स्पष्टीकरण

अ. या स्तोत्राच्या आरंभी गणेशाला स्तवन केले आहे. त्यानंतर या स्तोत्राचे मूळ दैवत कोण आहे, हे सांगितलेले आहेे. हे स्तोत्र ज्या ऋषींनी रचले आहे, त्या ऋषींचे नाव यात उल्लेखलेले आहेे. तसेच हे स्तोत्र कोणत्या वृत्तात किंवा त्याचा छंद कोणता आहे, हे सांगितलेले आहे. जेणेकरून त्याचे पठण करण्यास सुलभता व्हावी. या मंत्रामध्ये शक्तीचे कोणते रूप आहे ?, याचाही उल्लेख आला आहे. तसेच या स्तोत्राची शक्तीरक्षक देवता कोणती आहे ?, हेही सांगितले आहे. या आरंभीच्या विश्‍लेषणात्मक मांडणीवरून स्तोत्र म्हणतांना स्तोत्रातील गांभीर्य लक्षात घेऊन म्हटल्यास त्याची प्रचीती येते.

आ. प्रत्यक्ष भगवंतानेच ऋषींच्या माध्यमातून या स्तोत्राचे कथन केले असल्याने हे स्तोत्र प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आले आहेे, असे दिसून येतेे आणि म्हणूनच ते मंत्रस्वरूप झाले आहे.

इ. या स्तोत्रातून सीतेेची शक्ती मिळते. सीता ही श्रीरामाची अनपायिनी शक्ती (अपाय न करणारी) आहे. अग्नीची कायमस्वरूपी संलग्न शक्ती जशी दाहकता आहे, तशी सीता ही श्रीरामाची कायमस्वरूपी संलग्न असलेली शक्ती आहे, जी जगदानंदकारिणी असून श्रीरामासमवेत असल्याने ती शक्ती महान शक्तीमान झाली आहे.

ई. त्या शक्तीचे रक्षणकर्ते दैवत हनुमंत आहे, हेसुद्धा वर्णिले गेल्याने प्रत्यक्ष हनुमंत दृष्टीसमोर येऊन उभा रहातो आणि भक्ताच्या भावानुसार कार्यरत होतो.

या स्तोत्रातील आधारभूत रक्षक श्री हनुमान आहे. जसे बैलगाडीचा आधार चाक असते. त्या आधाराने बैलगाडी चालते. चाकाचा आधार असलेली खीळ जरी लहान असली, तरी ती चाकाला धरून ठेवते आणि गाडीचे रक्षण करते. त्यामुळे गाडी सहजरित्या इच्छितस्थळी पोचतेे. त्याप्रमाणे या स्तोत्रात हनुमंत हे दैवत कीलकम् या स्थानी देण्यामागे उद्देश असा की, तो वार्‍याच्या वेगाने जाणारा, वार्‍याच्या वेगाने संचार करणारा, इंद्रियांवर जय मिळवणारा, बुद्धीमान लोकांत श्रेष्ठ असा, वायुपुत्र वानरसमुदायाचा मुख्य असूनसुद्धा श्रीरामाचा दूत आहे. त्यानेच श्रीरामाचे सामर्थ्य ओळखून तो भगवंत आहे, हे ओळखले. एवढेच नव्हे, तर तो सर्वसामर्थ्यवान असूनही श्रीरामचंद्राच्या चरणांशी दास बनून सतत रामनामात असल्यामुळे राममय झाला आहे. (हनुमान सर्वसमर्थ असतांनासुद्धा रामभक्ती कशी करावी ?, त्याचे गुणगान कसे करावे ?, त्याची सेवा कशी करावी ?, हे या स्तोत्रावरून शिकायला मिळते.)

रामायणात त्याचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे तो चिरंजीव झाला आहे. हनुमंताला ज्यांनी ओळखले, त्या त्या संतांनी (उदा. समर्थ रामदासस्वामींनी) गावोगावी जाऊन गावांचे रक्षण होण्यासाठी त्याचे मंदिर बांधले आहे. आजही पुष्कळ लोकांना त्याची प्रचीती येते.

एवढ्या त्याच्या सामर्थ्यामुळे बुधकौशिकऋषींनी त्याला श्रीरामरक्षास्तोत्रात श्रीमद्हनुमान् कीलकम् । असे म्हटले आहे.
या स्तोत्राचे कीलक म्हणजे मंत्राची शक्ती बांधून ठेवणारे साधन, म्हणजेच किल्ली आरंभीच्या ओळींमध्ये सापडते आणि पुढे जाऊन या स्तोत्राचा गुह्य अर्थ उलगडत जातो.

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.३.२०१४)

1 thought on “रामरक्षा”

  1. खुपच सुंदर अर्थ आहे, माझ्या लहानपणी आजोबांनी रामरक्षा तोंडपाठ करून घेतली, साठ वर्ष झाली,

    Reply

Leave a Comment