उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय !

१. सनातन संस्था निःस्वार्थीपणे
राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करत आहे !

मी उज्जैन येथील सिंहस्थपर्वातील बहुतेक साधूसंतांच्या आखाड्यांना भेटी दिल्या. सर्व साधूसंत धर्मविषयी केवळ बोलतात; पण प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर एकाकडूनही अपेक्षित असे कार्य होतांना दिसत नाही. देशातील जनतेला अनेक संकटांनी घेरले आहे. अशा बिकट परिस्थितीत केवळ तुमचीच संस्था आणि तिचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करत आहेत, हेच या प्रदर्शनातून मला प्रकर्षाने जाणवले. आपल्या पुढील कार्यास माझ्या सदिच्छा असून मीही आपल्या कार्यात सहभागी होऊ इच्छितो.
– श्री. राकेश मणीलाल, झाबुआ, मध्यप्रदेश

२. प्रदर्शनाला प्रथम भेट दिल्यावर
हिंदु संस्कृतीची महानता लक्षात आली !

मी प्रदर्शनाला प्रथम भेट दिल्यावर मला हिंदु संस्कृतीची महानता लक्षात आली, तसेच आपल्या देशाच्या सद्यस्थितीला मी स्वत:ही उत्तरदायी आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या संस्थेतील कार्यकर्त्यांचा सेवाभाव पाहून मला कधी नव्हे इतका आनंद जाणवत होता आणि तो पुन्हा मिळवण्यासाठी मी ३ वेळा माझ्या अन्य मित्रांसह तुमचे प्रदर्शन पहाण्यासाठी आलो.
– श्री. लोकेश पटेल, देवास, मध्यप्रदेश