दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

Kumbh_Yayra-Suniyjan-0_Clr
यात्रा सुनियोजन करतांना सनातनचे साधक
Kumbh-prasar-1_Clr
अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांचे आणि साधू-संतांचे स्वागत करणारा सनातनचा फलक

     उज्जैन – येथील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाच्या निमित्ताने ९ मे या दिवशी ३० लाखांहून अधिक भाविकांनी आणि लाखो साधूसंतांनी क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले. या वेळी प्रचंड गर्दीचा ओघ असल्यामुळे पोलिसांना सर्वांना नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने यात्रा सुनियोजन करण्यात आले, तसेच येणारे सर्व संत आणि भाविक यांचे कापडी फलक लावून स्वागत करण्यात आले. सकाळी ६ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत साधक या नियोजनात होते.

१. प्रचंड गर्दी असल्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत रामघाटावर कोणालाही सोडण्यात येत नव्हते. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद निर्माण झाले.

२. नागरिकांचे म्हणणे होते की, आम्ही संतांचे स्नान होईपर्यंत थांबू शकत नाही. (संतस्नानानंतर त्या पाण्यात अधिक सात्त्विकता येते. त्यामुळे त्यांच्या स्नानानंतर स्नान केल्यास अधिक लाभ होतो, हे हिंदूंना कोणी न शिकवल्याचे फळ आहे ! – संपादक)

३. अनेक ठिकाणी पोलिसांनी सक्ती करत ५-६ किमीपासून वाहनांना बंदी केल्यामुळे तेवढे अंतर नागरिकांना चालत यावे लागले. परिणामी नागरिकांचा संयम सुटत होता.

४. या वेळी पोलीस प्रशासनाकडून गर्दी होऊ नये; म्हणून एका ठिकाणी असलेल्या लोकांना हुसकवण्याचे काम करत होते; मात्र लोक ऐकत नव्हते.

५. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साखळी करून लोकांना एका रांगेत स्नानासाठी सोडणे, साधूसंत यांच्या भोवती कडे करणे, लोकांना शांततेत पुढे-पुढे पाठवणे आदी प्रशासनाला साहाय्यक कृती करण्यात आल्या.

६. नागरिक पोलिसांचे ऐकत नव्हते. त्या वेळी सनातनच्या साधकांनी सांगितल्यावर नागरिक ऐकून पुढे जात होते.

७. पोलिसांनी लोकांना घाबरवण्यासाठी घोड्यांचा वापर केला. लोक ऐकत नसल्याचे पाहिल्यावर पोलीस नागरिकांच्या अंगावर घोडा घालत होते. (इंग्रजांप्रमाणे जनतेवर अत्याचार करणारे पोलीस आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणारे बेशिस्त नागरिक ! – संपादक) त्यामुळे नागरिक घाबरून पळत होते.