
‘पिळ्ळैयारपट्टी (‘पिळ्ळैयार’ म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाचे मंदिर हे तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे. हे मंदिर एक सहस्र वर्षांपूर्वी पल्लव राजांच्या काळात बांधले गेले आहे. गजाननाचा आकार डोंगरातूनच उत्पन्न झाला आहे. मंदिरामागे गेल्यास या डोंगराचे आपल्याला दर्शन घडते. गजाननाच्या स्वयंभू आकाराच्या रहस्याचा कालखंड कुणालाही ठाऊक नाही. या गजाननाच्या उजव्या हातात शिवपिंडी धरलेली आढळून येते. सामान्यतः श्री गणेशाला ४ हात असतात. या स्वयंभू मूर्तीला मात्र २ हात आहेत. मूर्तीमागे डोंगरातच एक शिवपिंडीही आपोआप तयार झालेली आहे; परंतु या शिवपिंडीचे आपल्याला दर्शन घेता येणे शक्य होत नाही.

श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य !
सिक्कीममधील ‘गणेश टोक’ या जागृत मंदिराचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दर्शन घेतले !
भगवान शिवाला काशीक्षेत्री वास्तव्य करता यावे, यासाठी कार्य करून काशीक्षेत्रीच विराजमान झालेला श्री धुंडीराज विनायक...
कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्या ऋषिगणांची विघ्ने हरण करणारा इडगुंजी (कर्नाटक) येथील श्री महागणपति...
कुंभासुराचा वध करण्यासाठी भीमाला तलवार दिलेला कर्नाटक राज्यातील कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील श्री महागणपति !
श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरातमधील प्राचीन गणपति मंदिराचे वैशिष्ट्य आणि महत्त्व !