भूकंप, पूर इत्यादी आपत्काळात उपयुक्त ठरतील, अशा वस्तू

अ. तंबू, मोठी ताडपत्री आणि प्लास्टिकचा मोठा जाड कागद

आ. जीवरक्षक-कवच (लाईफ जॅकेट) आणि लहान नौका (डिंघी बोट)

पूरस्थिती उद्भवू शकणार्‍या ठिकाणी रहात असणार्‍या व्यक्तींसाठी या वस्तू उपयुक्त आहेत. या वस्तू ‘ऑनलाईन’ विकत मिळतात. लहान नौका खरेदी केल्यावर ती चालवण्यासही शिकावे.

इ. ‘गॅस मास्क’ (Gas Mask) आणि ‘पोर्टेबल ऑक्सिजन मास्क टँक’ (Portable Oxygen Mask Tank)

विषारी वायूची गळती झाल्यास ‘गॅस मास्क’ उपयोगी पडतो. याचा वापर करून व्यक्तीला सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करता येतो. ‘पोर्टेबल ऑक्सिजन मास्क टँक’चा उपयोग रुग्णाला तातडीने प्राणवायू देता आल्याने त्याच्या प्राणरक्षणासाठी होऊ शकतो.

ई. ‘वॉकी-टॉकी’ (Walkie Talkie) आणि ‘हॅम रेडिओ’ (Ham Radio)

उ. अन्य वस्तू

कपाळावर लावायची विजेरी (यामुळे दोन्ही हात मोकळे रहातात.), छोटी दुर्बीण, ‘सिग्नलिंग मिरर’ (या लहान आरशाच्या लुकलुकण्यामुळे आपण अडकून पडलेले ठिकाण दूरवरच्या लोकांच्या लक्षात येऊ शकते.), ‘पॅरा कॉर्ड’ (Para Cord – जास्त वजन पेलण्याची क्षमता असलेली दोरी), ‘रेन पाँचो’ (Rain Poncho – टोपी असलेला मोठा ‘रेनकोट’), व्यक्ती संकटात सापडली असता (उदा. भूकंपामुळे ढिगार्‍याखाली सापडली असता) इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठा आवाज करणारी यंत्रणा (Emergency Personal Alarm) आणि ‘थर्मल ब्लँकेट’ (कडाक्याची थंडी असणार्‍या प्रदेशात उपयुक्त)