अ. घरातील लहान दुरुस्त्यांसाठी उपयुक्त वस्तू

टेकस (लहान चुका, चामड्याच्या चपलेचा अंगठा तुटला, तर तो लावण्यासाठी टेकस वापरतात.) चुका (छोटे खिळे) खिळे हातोडी
पान्हे पक्कड ‘स्क्रू ड्रायव्हर’ ‘कटर’
लहान फळी कापण्यासाठी करवत फळीची कडा घासण्यासाठी ‘पॉलीश पेपर’ कात्री ‘मीटर टेप’

आ. शिवणकामाच्या वस्तू

सुई-दोरा बटणे कात्री ‘मेझरिंग टेप’ (कापड मोजण्यासाठी)
शिवण यंत्र

इ. उपद्रवी प्राण्यांना प्रतिबंध करणार्‍या वस्तू

डास, उंदीर, ढेकूण, मुंग्या, उवा, लिखा (उवांची अंडी) इत्यादींना प्रतिबंध करणारी औषधे उंदीर पकडायचा पिंजरा मच्छरदाणी

ई. घरात अतिरिक्त असाव्यात, अशा वस्तू

अंघोळीची बालदी पाणी अंगावर घेण्यासाठीचा ‘मग’ कपडे भिजवण्यासाठीची बालदी कपडे धुण्याचा ‘ब्रश’
विजेशी संबंधित वस्तू (उदा. विद्युत् दिवे, दंडदीप [ट्यूब्स], विजेची जोडणी करणारी ‘थ्रीपिन’ [भिंतीवर असलेल्या विद्युत कळफलकात, म्हणजे ‘स्वीच बोर्डा’त इस्त्रीसाठी किंवा अन्य कारणासाठी तीन भोके असलेले एक स्थान ठेवलेले असते. तेथे ‘थ्रीपिन’ घालतात. तेथून नवीन ठिकाणी विद्युतप्रवाह नेता येतो.] अन् ‘होल्डर’ [यात विद्युत दिवा, म्हणजे ‘बल्ब’ घातला जातो.]) पायांत घालायच्या ‘स्लीपर’चे पट्टे

उ. अन्य वस्तू

आकाशवाणीवरून देण्यात येणार्‍या शासकीय सूचना ऐकण्यासाठी लहान रेडिओ (ट्रान्झिस्टर) किंवा रेडिओ किल्लीवर चालणारे घड्याळ उत्पादनाच्या दिनांकापासून पुढे अनेक वर्षे चालणारे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) हातावरचे घड्याळ (अशी हातावरची घड्याळे ५० वर्षेही चांगली चालतात. हाताच्या हालचालीमुळे ती चालतात. हातावरून काढून ठेवल्यास साधारण ३ दिवस चालतात.), सौरऊर्जेवर चालणारे घड्याळ भ्रमणभाष प्रभारित करण्यासाठी ‘पोर्टेबल सोलर चार्जर’
‘गॅस लायटर’ वार्‍याने ज्योत न विझणारा ‘लायटर’ (विंडप्रूफ लायटर), मेणबत्ती सुतळ
सुंभ कपडे वाळत घालण्यासाठी दोरी सायकलमध्ये हवा भरण्याचा ‘पंप’ वीजप्रवाह तपासण्यासाठी ‘टेस्टर’