श्री. समीर यांच्यासाठी दिलेला लढा हा हिंदुत्वनिष्ठांसाठी दीपस्तंभ !

‘धर्म’ विरुद्ध अधर्म’ असाच लढा !

१७ जून २०१७ या दिवशी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन संमत झाल्याचे वृत्त घोषित झाले. त्यानंतर क्षणार्धातच गेल्या पावणेदोन वर्षातील घटनाक्रम आमच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्यातील काही मोजकी क्षणचित्रे येथे शब्दांकीत केली आहेत. सनातन संस्था, सनातनचे साधक तसेच श्री. समीर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर पुरोगामी, समाज आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून टीकेचा वर्षाव चालू झाला. ईश्‍वर, संत यांची कृपा आणि हिंदुत्वनिष्ठांचा पाठिंबा यांमुळे त्यांच्या अधिवक्त्यांनी हा न्यायालयीन लढा आता जिंकत आणला आहे. ईश्‍वर तोही लवकरच जिंकून देईल, याची आम्हाला निश्‍चिती आहे.

Follow us on Youtube

श्री. समीर गायकवाड यांच्या छळवादाचा घटनाक्रम !

१५.९.२०१५ : श्री. समीर गायकवाड यांना विशेष अन्वेषण पथकाकडून (‘एस्.आय.टी.’कडून) सांगली येथील रहात्या घरातून अटक

१६.९.२०१५ : श्री. गायकवाड यांना अधिवक्ताही मिळू न देता १४ दिवस त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची न्यायालयाकडे ‘एस्.आय.टी.’ची मागणी; मात्र न्यायालयाकडून श्री. गायकवाड यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

१. तोपर्यंत काही पोलिसांनी प्रसारमाध्यमांना कळवले आणि त्यांनी लगेचच सनातनविरोधी अपप्रचार चालू केला !

२. तोंडावर बुरखा घातलेल्या श्री. गायकवाड यांचे अतिरेक्याप्रमाणे सादरीकरण !

अधिक वृत्त वाचा…

समीर गायकवाड यांच्या खटल्याच्या संदर्भात शासकीय अधिवक्त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भातील गलथानपणा !

१५.१.२०१६ : या खटल्यात शासकीय पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने महाधिवक्ता श्रीहरि अणे त्यांची नियुक्ती केली.

२८.२.२०१७ : अधिवक्ता शिवाजीराव राणे यांची शासनाने ‘विशेष शासकीय अधिवक्ता’ म्हणून नियुक्ती न करताच त्यांचा युक्तीवाद चालू.

१६.३.२०१७ : अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शासकीय अधिवक्त्यांच्या नियुक्तीविषयी होणारे अपप्रकार उघड केले. शिवाजीराव राणे यांची नियुक्तीच अवैध असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केली.

अधिक वृत्त वाचा…

१४.१२.२०१६ या दिवशी समीर गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रातील कथित आरोप !

(म्हणे) ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथातील लिखाण वाचून श्री. समीर गायकवाड प्रभावित झाले.’

(म्हणे) ‘कॉ. पानसरे यांनी सनातनविरोधी केलेली वक्तव्ये, तसेच कॉ. पानसरे यांच्यावर प्रविष्ट असलेले विविध खटले यांमुळे समीर याने कॉ. पानसरे यांच्या हत्येचा कट रचला !’

(म्हणे) ‘समीर गायकवाड यांची भ्रमणभाषवरील ९ संभाषणे संशयास्पद !’

(कथित) आरोपपत्राची व्याप्ती : ३९२ पृष्ठांचे आणि ७७ साक्षीदारांच्या साक्षी असलेले आरोपपत्र !

अधिक वृत्त वाचा…

खटला लांबवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांचा पिस्तुलाच्या अन्वेषणाविषयीचा अक्षम्य पोरखेळ !

१७ फेब्रुवारी २०१७ या दिवशी डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा उपयोग केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे विशेष अन्वेषण पथकाने सांगितले. म्हणजे दाभोलकर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कह्यात घेतलेले पिस्तुल मारेकरी घेऊन जात आणि अन्य दोन हत्या करून त्यांनी ते पुन्हा पोलिसांकडे होते त्या ठिकाणी ठेवले, असा पोरखेळ करणारा युक्तीवाद करण्यात आला.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) सदर पिस्तुल हे ‘स्कॉटलंड यार्ड’मध्ये पडताळण्यासाठी पाठवल्याचेही सांगितले; मात्र काही दिवसांपूर्वी ‘सदर पिस्तुल स्कॉटलंड यार्डने स्वीकारलेच नाही’, असे सांगण्यात आले.

अधिक वृत्त वाचा…

समीर गायकवाड यांचे वकीलपत्र घेण्यास सिद्ध झालेल्या ३१ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या सत्याचा विजय !

सप्टेंबर २०१६ मध्ये पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या दबावामुळे कोल्हापूर येथील अधिवक्ते पोलिसी अन्याय झालेल्या श्री. समीर गायकवाड यांचे वकीलपत्र घ्यायलाही सिद्ध नव्हते. ‘कोल्हापूर बार असोसिएशन’ने तसा ठराव संमत केला होता. (या देशात कसाबचे वकीलपत्र घेतले जाते; मात्र निर्दोष असलेल्या सनातनच्या साधकाचा खटला चालवायला अधिवक्ते पुढे येत नाहीत ! पकडलेली व्यक्ती दोषी आहे कि नाही, याचा कोणताही विचार न करता त्याचा न्यायालयीन अधिकार नाकारणे, हे मानवाधिकाराचेच हनन ! – संपादक) हे समजताच हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी हिंदुनिष्ठ अधिवक्त्यांना आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ३१ धर्माभिमानी अधिवक्ते श्री. समीर गायकवाड यांचे वकीलपत्र घ्यायला पुढे आले.

अधिक वृत्त वाचा…

सनातनसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेल्या संतांविषयी कृतज्ञता !

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

पुणे येथील प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, योगतज्ञ दादाजी वैशंपायन, प.पू. पांडे महाराज आणि अन्य सनातनचे हितचिंतक संत, तसेच सनातनचे संत आदींनी सनातनच्या साधकांवरील संकट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केल्या. त्यांच्या प्रार्थनेमुळे सूक्ष्मातून झालेल्या अनमोल आध्यात्मिक कार्याविषयी सनातन संस्था त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
सत्यातील आनंद अनुभवू देणारे ईश्‍वराचे योगदान ! – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
‘सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन मिळाल्याचे ऐकल्यावर पुष्कळ आनंद झाला. भगवंताच्या म्हणजेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच आज हा आनंद अनुभवायला मिळाला.
अधिक वृत्त वाचा…

हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, सांप्रदायिक, सनातनचे हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ पक्ष यांचे आभार !


पुरोगामी आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी सनातन संस्थेवर टीकेची झोड उठवली असतांना नेहमीप्रमाणे याही वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, संस्था, संप्रदाय, पक्ष याही वेळी समर्थपणे पाठीशी राहिले. त्यांनी पुरोगाम्यांच्या खोट्या आवईविरुद्ध वेळोवेळी सडेतोडपणे चोख प्रत्युत्तर देत सनातनवरील  दृढ विश्‍वास वेळोवळी प्रकट केला. सनातनसमवेत आंदोलनात सहभागी होणे, निवेदने देणे, पुरोगाम्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देऊन ते यशस्वी करणे, अशा कृती कोल्हापुरातील हिंदुत्वनिष्ठांनी केल्या, तर देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी सातत्याने सनातनच्या समर्थनार्थ सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराणा प्रताप बटालीयन, वारकरी संप्रदाय यांसारख्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलने केली. त्यामुळे सनातनची बाजू योग्यच आहे, हे शासन आणि समाज यांना कळण्यास साहाय्य झाले.
अधिक वृत्त वाचा…

संबंधित वृत्ते

no posts found