काळी शक्ती

‘काळी शक्ती, तसेच त्रासदायक/मायावी/अनिष्ट शक्ती’ यांसारखे सर्व शब्द धर्मग्रंथांत (उदा. श्रीमद्भगवद्गीतेत) वर्णिलेल्या ‘तम’ किंवा ‘तमोगुण’ या अर्थाने, तर ‘काळे आवरण, तसेच काळ्या लहरी/स्पंदने/कण’ यांसारखे शब्द ‘तमोगुणाचे आवरण, तसेच तमोगुणी लहरी/स्पंदने/कण’ या अर्थाने वापरण्यात आले आहेत. ‘तम’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘काळोख’ असा आहे. काळोख काळा असल्यामुळे ‘तम’ अथवा ‘तमोगुण’ काळा असल्याचे वर्णिले, तसेच चितारले आहे.