स्वभावदोष-निर्मूलन सत्संग

स्वभावदोष-निर्मूलन सत्संग म्हणजे स्वभावदोष-निर्मूलनासाठी समष्टी (सामूहिक) स्तरावर प्रयत्‍न करण्याचे एक माध्यम होय. यात स्वतःकडून होणार्‍या चुका संबंधित स्वभावदोष आणि त्या चुका टाळण्यासाठी करावयाचे उपाय यांसह सर्वांसमोर सांगणे; इतरांच्या चुकांमधून बोध घेणे; परस्परांकडून होणार्‍या चुकांची संबंधितांना जाणीव करून देणे अन् त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वैयकि्तक, तसेच सामूहिक स्तरावर नित्यासाठीच उपाययोजना निश्‍चित करणे या कृती अंतर्भूत होतात. याविषयी सविस्तर ज्ञान या ग्रंथमालिकेतील ग्रंथ ‘स्वभावदोष-निर्मूलन परिणामकारक होण्यासाठी समष्टी स्तरावर करावयाचे उपाय’ यात दिली आहे.