स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया

जीवन सुखी होऊन साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी सनातन संस्था ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ व्यक्‍तीगत, तसेच सामूहिक स्तरांवर आचरणात आणण्यास शिकवते. या ग्रंथात बर्‍याच ठिकाणी स्वतःच्या वर्तनाचे निरीक्षण करून अयोग्य कृती आणि अयोग्य प्रतिक्रिया, तसेच संबंधित स्वभावदोष शोधणे; ते स्वभावदोष-निर्मूलन सारणीत लिहिणे; योग्य कृती अन् योग्य प्रतिक्रिया निश्‍चित करणे; स्वयंसूचना बनवणे; अभ्याससत्रे करणे अन् प्रक्रियेतील प्रगतीचा आढावा घेणे या कृतींचा उल्लेख आलेला आहे. या कृती म्हणजे ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिये’तील विविध टप्पे आहेत. या टप्प्यांविषयीचे सविस्तर विवेचन या ग्रंथमालिकेतील ग्रंथ ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ यात दिली आहे.