सूक्ष्मातील कळणे

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वापराविना एखाद्या गोष्टीचे आकलन होणे, म्हणजे एखादी गोष्ट कळणे, याला ‘सूक्ष्मातील कळणे’ असे म्हणतात. एखाद्या गोष्टीचे उत्तर कळणे, चांगली किंवा त्रासदायक स्पंदने जाणवणे, शक्ती, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती येणे इत्यादी सूक्ष्मातील कळण्याची उदाहरणे आहेत. सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २० टक्के असते, तर मोक्षाला गेलेल्या व्यक्तीची पातळी १०० टक्के असते. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता सर्वसाधारण व्यक्तीत नसते. साधनेने ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी झाल्यावर सूक्ष्मातील थोडेफार कळू लागते आणि पुढे जसजशी पातळी वाढते, तसतशी ही क्षमता वाढते. गुरुकृपा असल्यास पातळी न्यून (कमी) असतांनाही सूक्ष्मातील कळू शकते.