व्यष्टी साधना

ज्या कुळाची कुलदेवता आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्‍त असते अशा कुळातच ईश्‍वराने आपल्याला जन्माला घातलेले असल्याने शीघ्र
आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या कुलदेवतेचा नामजप करणे, तसेच पूर्वजांच्या अतृप्त लिंगदेहांमुळे होणार्‍या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप करणे आवश्यक असते. केवळ व्यष्टी साधनेने कनिष्ठ मोक्ष (मुक्‍ती) या टप्प्यापर्यंत जाता येते; श्रेष्ठ मोक्ष (ईश्‍वराशी एकरूपता) साधता येत नाही. जिवाची आध्यात्मिक पातळी १०० टक्के झाल्यावरच म्हणजे जिवाची समष्टी साधना पूर्ण झाल्यावरच तो ईश्‍वराशी एकरूप होतो. मात्र काही जिवांच्या समष्टी साधनेचा टप्पा गतजन्मात पूर्ण झालेला असल्याने अशांना या जन्मात केवळ व्यष्टी साधना करूनही ईश्‍वराशी एकरूप होता येते.