मोक्ष

मोक्षाचे दोन प्रकार आहेत – कनिष्ठ मोक्ष आणि श्रेष्ठ मोक्ष. केवळ व्यष्टी साधना (वैयक्‍तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्‍न) करून कनिष्ठ मोक्ष (मुक्‍ती) मिळवता येतो. यामुळे उच्च लोकात स्थान मिळते आणि तेथे काही काळ साधना केल्यानंतर ईश्‍वरप्राप्ती होते. व्यष्टीसह समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्‍न) केल्याने
श्रेष्ठ मोक्ष मिळतो, म्हणजे थेट ईश्‍वराशीच एकरूप होता येते.