क्षात्रधर्म साधना

‘क्षात्रधर्म साधना’ म्हणजे ‘साधकांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’. सूक्ष्म रूपातील दुर्जन वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी सूक्ष्म रूपातील शस्त्रे वापरणे आवश्यक असते आणि ती शस्त्रे म्हणजे नामजप अन् प्रार्थना. ‘गुरुकृपायोगा’त देवतेच्या तारक आणि मारक रूपांचा नामजप करण्यास शिकवले आहे. त्यांपैकी देवतेच्या मारक रूपाचा नामजप हा वाईट शक्‍तींचा नाश करण्यासाठी विशेष उपयुक्‍त ठरतो.