एक विद्वान

सनातनचे काही साधक अनेक वर्षे साधना (तप) करत असल्याने त्यांची अध्यात्मातील प्रतिभा जागृत होऊन त्यांना विविध विषयांवर ‘ज्ञान’ स्फुरत आहे. ही अनुभूतीच आहे. अनुभूतीयेण्याच्या संदर्भातील धर्मशास्त्रीय आधार पुढीलप्रमाणे – ततः प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते । – पातञ्जलयोगदर्शन, पाद ३, सूत्र ३६ अर्थ : आत्म्याच्या ठिकाणी संयम (योगाभ्यास वा ध्यान) केल्याने प्रतिभासामर्थ्यामुळे सूक्ष्म, व्यवहित (लपलेल्या) किंवा अतिदूर वस्तूंचे ज्ञान होणे (अंतर्दृष्टी प्राप्त होणे), दिव्य (दैवी) नाद ऐकू येणे, दिव्य स्पर्श कळणे, दिव्य रूप दिसणे, दिव्य रसाची गोडी चाखता येणे आणि दिव्य गंध समजणे या सिद्धी प्राप्त होतात. विश्लेषण : सनातनच्या काही साधकांना श्लोकात वर्णिल्याप्रमाणे एखाद्या विषयाशी संबंधित चिंतन केलेले नसतांना त्याविषयी प्रतिभा जागृत होऊन ज्ञान स्फुरणे, दिव्य नाद ऐकू येणे, सूक्ष्म रूप (सूक्ष्म-चित्र) दिसणे इत्यादी विविध प्रकारच्या अनुभूतीयेत आहेत. यावरून साधकांना स्फुरणारे ज्ञान असो कि योगाभ्यासातून साधकांची जागृत होणारी अंतर्दृष्टी असो, या दोहोंना धर्मशास्त्रीय आधार आहे, हे सिद्ध होते. ज्ञान मिळणार्‍या साधकांचा नम्रपणा ! यासंदर्भात ‘हे ज्ञान माझे नसून हे साक्षात् ईश्वरी ज्ञान आहे’, असा संबंधित साधकांचा भाव असतो. अहंकार वाढू नये, यासाठी ते ज्ञानाच्या लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव न लिहिता स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव लिहितात आणि कंसात स्वतः माध्यम असल्याचे लिहितात, उदा. सूक्ष्मजगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून). सूक्ष्मजगतातील ‘एक विद्वान’ त्यांना ज्ञान देतात, असा सौ. अंजली गाडगीळ यांचा भाव असतो.