आध्यात्मिक पातळी

प्रत्येक व्यक्‍तीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. व्यक्‍तीने साधना, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्‍न आरंभ केल्यावर तिच्यामधील रज-तम गुणांचे प्रमाण घटू लागते आणि सत्त्वगुणाचे प्रमाण वाढू लागते. सत्त्वगुणाच्या प्रमाणावर आध्यात्मिक पातळी अवलंबून असते. सत्त्वगुणाचे प्रमाण जितके जास्त, तितकी आध्यात्मिक पातळी जास्त असते. सर्वसाधारण व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते, तर मोक्षाला गेलेल्या व्यक्‍तीची आध्यात्मिक पातळी १०० टक्के असते आणि तेव्हा तो त्रिगुणातीत होतो.