उच्छिष्ट गणपति यज्ञ

pp_rambhau_maharaj_2

साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रथमच १५ जानेवारी या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वांचे कल्याण व्हावे अन् जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली झालेल्या या यज्ञाने हिंदु धर्मातील यज्ञ संस्कृतीचे सामर्थ्य पुन्हा प्रत्ययास आले.

यज्ञापूर्वी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना प.पू. रामभाऊस्वामी म्हणाले, साधकांचे त्रास दूर होण्यासाठी मी स्वतः समिधा होईन. प्रत्यक्षातही यज्ञात आहुती देत असतांना प.पू. रामभाऊस्वामी यांनी अनेकदा यज्ञकुंडावर स्वतःला झोकून देत अग्नीप्रवेश केला. विशेष म्हणजे धगधगत्या अग्नीकुंडात सलग पाच ते दहा मिनिटे पहुडल्यानंतरही त्यांच्या देहाला अग्नीचा दाह झाला नाही कि वस्त्रांनी पेट घेतला नाही. प.पू. रामभाऊस्वामी यांनी अग्नीत प्रवेश केल्याचे दृश्य विलक्षण होते. साधकांच्या त्रासांचे निराकरण होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी ते अत्यंत शरणागतभावाने अग्निनारायणाला विनवत आहेत, असेच जाणवत होते.

यज्ञाची वैशिष्ट्ये

प.पू. रामभाऊ महाराज यांची वैशिष्ट्ये

सूक्ष्म-परीक्षण

अनुभूती

no posts found